‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ महायुतीची भव्य तिरंगा यात्रा!

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह भाजपाचे नेते सामील

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ महायुतीची भव्य तिरंगा यात्रा!

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध सुरु केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला मोठे यश मिळाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पिओके आणि पाकिस्त्नानमधील दहशतवाद्यांचे ९ स्थळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा भारताने दावा केला. भारताच्या कारवाईत पाकचे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करण्यात आले. भारताची आक्रमक भूमिका पाहून पाकने अखेर माघार घेतली आणि युद्धबंदीवर सहमती दर्शवली. पाकने माघार घेताच भारतानेही युद्धबंदी मान्य केली आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले. ऑपरेशन सिंदूरला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज (१४ मे) ‘भव्य तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तीनही दलाच्या सैनिकांनी चोख कामगिरी बजावत पाकचे प्रत्येक हल्ले उधळून लावले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताचे ८ जवान हुतात्मा झाले. भारताच्या सैनिकांमुळे देशवासी आज सुरक्षित आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ महायुतीकडून ‘भव्य तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. मुंबईच्या ऑगस्टक्रांती मैदानात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

महायुतीच्या भव्य तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, भाजपा आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाणसह भाजपाचे आदि नेते उपस्थित होते. या यात्रेत भारतीय सेनेतील निवृत्त सेना अधिकारी, जवान होते.

ऑगस्टक्रांती मैदान ते गिरगांव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबळे चौकापर्यंत ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता. ‘ वंदे मातरम’ ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमन गेला.

हे ही वाचा : 

छत्तीसगढच्या करेगुट्टात ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान!

कोलकात्यात आत्मघातकी हल्लेखोर पाठवू!

पाकिस्तानचा घसा पडला कोरडा!

चुकीची माहिती पसरवल्याबद्दल तुर्कीच्या TRT World चे एक्स हँडल ब्लॉक

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्वीटकरत म्हटले, ऑपरेशन सिंदूरचे यशस्वी करणाऱ्या तिन्ही सेना दलाच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आज मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे ऑगस्टक्रांती मैदान ते गिरगांव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओम्बळे चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढली. ‘हिंद की सेना शान है, घुटने पे पाकिस्तान है’, ‘ वंदे मातरम’ ‘भारत माता की जय’ या घोषणांच्या जय घोषात ही यात्रा निघाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आदी नेते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये उपस्थिती होती.

Exit mobile version