सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडिया, इंडिगोकडून ‘या’ शहरांना जाणारी उड्डाणे रद्द

सात शहरांचा समावेश

सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडिया, इंडिगोकडून ‘या’ शहरांना जाणारी उड्डाणे रद्द

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धबंदी जाहीर झाली असली तरी, तणावाची परिस्थिती अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंडिगो आणि एअर इंडियाने सात शहरांमधील त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई निर्बंध आणि वाढलेल्या सुरक्षा उपायांचा हवाला देत इंडिगो आणि एअर इंडियाने १३ मे साठी उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक शहरांमधील उड्डाणे स्थगित केली आहेत.

इंडिगोने रात्री ११:५९ वाजेपर्यंत श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की, प्रवासाच्या योजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो हे आम्हाला समजते आणि त्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल वाईटही वाटते. आमचे पथक परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत आणि पुढील अपडेट्सची माहिती देत राहतील.

एअर इंडियाने जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान सेवा रद्द करण्याची घोषणा केली. एअरलाइनने अपडेट शेअर करत म्हटले आहे की, “नवीन घडामोडी लक्षात घेता आणि तुमच्या सुरक्षिततेचा विचार करता, मंगळवार, १३ मे रोजी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान कंपन्या रद्द करण्यात आल्या आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि तुम्हाला अपडेट देत राहू.”

हे ही वाचा : 

अमेरिकेशी व्यापारावर चर्चा झालेली नाही; ट्रम्प यांच्या ‘त्या’ दाव्याचे भारताकडून खंडन

पाकिस्तानविरोधात भारताची कारवाई स्थगित आहे, समाप्त झालेली नाही!

“भारत- पाक युद्धबंदीमध्ये अमेरिकेची भूमिका ही मध्यस्थाची नव्हे तर रचनात्मक”

सेनादलांचे स्पष्ट संकेत, दु:साहस केलेत तर तांडव होणार…

सोमवारी संध्याकाळी, अमृतसरमध्ये खबरदारीच्या उपाययोजना लागू केल्यानंतर, अमृतसरला जाणारे इंडिगोचे विमान दिल्लीला परतले, अशी माहिती आहे. सांबा, अखनूर, जैसलमेर आणि कठुआ येथे ड्रोन आढळून आल्यानंतर एअरलाइन्सने ही कारवाई केली. मात्र, भारतीय लष्कराने मंगळवारी स्पष्ट केले की अलिकडच्या काळात कोणत्याही ड्रोन हालचाली आढळल्या नाहीत आणि युद्धबंदी कायम आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सोमवारी तणावाच्या काळात विमानतळे पुन्हा सुरू केली असली तरी, विमान कंपन्यांनी सावधगिरी बाळगून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version