भारतीय सेनादलाचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या नेतृत्वाखाली काल-आज अशा दोन पत्रकार परिषदा झाल्या. नौदल, हवाई दलाचे प्रमुख अधिकारी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगण्यात आलं त्यातलं बरंच ‘बिटवीन द लाईन’ होतं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणे सेनाधिकाऱ्यांनी टाळली. तज्ज्ञ वगळता बरंच काही अनेकांच्या डोक्यावरून गेलं. ते स्वाभाविक सुद्धा आहे. ज्यांना पत्रकार
परिषदांचा आशय समजला नाही. त्यांना आजच्या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला स्क्रीनवर दिलेल्या राष्ट्र कवी दिनकर यांच्या काही पंक्ती, एअर मार्शल ए.के.भारती यांनी उद्धृत केलेल्या रामचरीतमानसच्या पंक्ती तसेच आज इंडियन
आर्मीने एक्सवर अपलोड केलेला व्हिडिओ तरी पाहून घ्यावा याच्यामध्ये शिवतांडव स्तोत्राची धून आहे. पाकिस्तानात जे काही घडले आहे, त्याचा भावार्थ लक्षात येऊ शकेल.
सेनादलांच्या आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली. लढाई दहशतवाद्यांशी होती, पाक मिलिटरीने अंगावर घेतली. भारताचे सगळे मिलिटरी बेस कार्यान्वित आहेत, कोणत्याही कारवाईसाठी, सज्ज आहेत.
याचा अर्थ हवाईतळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा प्रचार फक्त बाता आहेत. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला राष्ट्रकवी दिनकर यांच्या कृष्ण की चेतावनी… कवितेतील काही पंक्ती स्क्रिनवर दिसत होत्या. याचना नही, अब रण होगा,
जीवन जय या मरण होगा… एअर मार्शल ए.के.भारती यांनी महाकवि तुलसीदास यांच्या काही पंक्ती उद्धृत
केल्या. विनय ना मानत जलधी जड गये तीन दिन बिती कहे राम सकोप तब भय बिन होय न प्रीती…
भारतीय सेना दलांना जे काही सांगायचे आहे, त्यासाठी हे पुरेसे होते. हे संकेत होते, की काही तरी भीषण होणार आहे. सकाळी १२ वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये जे बोलणे होणार होते, ते ही पत्रकार परिषद संपेपर्यंत झाले
नव्हते. याचा अर्थ मामला गडबड है. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल इंडीयन आर्मीच्या एक्स हॅंडलवर सेनादलांच्या कारवाईबाबत एक व्हीडियो अपलोड करण्यात आला होता. त्यात महान शिवभक्त दशानन रावण
लिखित शिवतांडव स्तोत्राची धून होती. तांडव झालेले आहे आणि तांडव थांबलेले नाही, हे स्पष्ट करणार हे संकेत आहेत.
‘एक्स’ वर जेव्हा ‘इंडियन आर्मी’च्या माध्यमातून एखादी पोस्ट अपलोड होते, त्याचा उद्देश माहिती देणे इतका मर्यादित असतो. म्हणूनच असा एखादा व्हिडिओ ज्याच्यामध्ये शिवतांडव स्तोत्राची धून आहे, त्याचा अर्थ आपण समजून
घेण्याची गरज आहे. याचा थेट संबंध पाकिस्तानमध्ये झालेल्या तांडवाशी आहे ७ मे च्या पहाटे आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये जे काही झालं त्याचं महत्व अनेकांच्या लक्षात येत नाहीये. त्याची अनेक कारणे आहेत. भारताचे
लष्करी अधिकारी शंभर असेल तर ७० सांगतात. भारताचे राजकीय नेते तर या संपूर्ण घटनाक्रमाच्या दरम्यान तोंड सुद्धा उघडत नाहीत. जगातील कोणत्याही प्रोफेशनल आर्मीने हेच केलं असतं, जगातल्या कोणत्याही जबाबदार नेत्यांनी हेच
केलं असतं. परंतु यामुळे एक समस्या मात्र निर्माण होते. आपण जे केलं ते पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचत नाहीये.
हे ही वाचा:
तुर्कस्तानचा निषेध: पुण्यातील व्यापाऱ्यांचा सफरचंदावर बहिष्कार!
काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह
उद्या दहावीचा निकाल! कुठे पाहता येईल निकाल?
जोश हेजलवुडची आयपीलएमधून माघार?
भारताने जे काही केले ते अद्भूत आहे. त्यातले काही डीजीएओ राजीव घई यांच्या पत्रकार परिषदेतून समोर आले काही. जागतिक संरक्षण तज्ज्ञांच्या द्वारे हळूहळू पुढे येत आहे. जे काही पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले, त्यावर एक
नजर टाकू. पाकिस्तानची तांत्रिक आस्थापने, कमांड कण्ट्रोल सेंटर, रडार साईट, हत्याराचे डेपो. रफिकी, चकलाला, रहीमतयार खान, स्कार्दू, सरगोधा, भिलोरी, मुरीद या हवाई तळांवर हल्ला केला. इस्लामाबाद आणि रावळपिंडी या दोन शहरांतील तळ नष्ट करण्यात आले. यापैकी एक राजधानी आणि दुसरा सैन्याचा सगळ्यात मोठा तळ. जिथे पाकिस्तानचे मिलिटरी कमांड आणि आयएसआयचे कमांड आहे. शहबाज शरीफ आणि जनरल आसिफ मुनीर यांच्या कानाखाली आवाज काढला.
आपण पत्रकार परीषद घेतली, पाकिस्तानला सणसणीत थप्पड मारली. त्यामुळे नंतर त्यांचा डीजीआयपीआर अहमद शरीफ चौधरी याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची दखल स्काय न्यूज या विदेशी वाहिनीने घेतली आहे. हा
भारताला उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न होता. भारताने कारवाईचे व्हीडीयो, उपग्रहांच्या माध्यमातून घेण्यात आलेले फोटो सादर केले. पाकिस्तानने मात्र फक्त बाता मारल्या. ना पुरावे, ना व्हीडीयो, ना तपशील. इंडीयन आर्मीच्या एक्स हॅडलवर शिवतांडव स्तोत्राची धून टाकली होती, त्याची दखलही या वाहिनीने घेतलेली आहे. ही दखल खरे तर भारतीय लष्कराच्या तांडवाची आहे. भारताने तिंबून काढल्यानंतर पाकिस्तानने बचाओ बचाओ असा अमेरिकेचा धावा करायला सुरूवात केली. अमेरिकी उपराष्ट्रपती जे.डी.वान्स, सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिया या मुत्सद्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली. तात्पुरता युद्ध विराम जाहीर झाला.
रिपब्लिक चॅनलवर अर्णब गोस्वामी यांनी सांगितले की अशा काही गोष्टी आहेत, ज्या देशहित लक्षात ठेवून उघड करता येत नाहीत. ज्या गोष्टी भारतीय मीडिया उघड करू शकला नाही, त्या नेमक्या काय आहेत? जे आपला मीडिया सांगू
शकला नाही, ते त्याची कुजबुज सुरू झाली आहे. ज्येष्ठ संरक्षण विश्लेषक डेरेक ग्रॉसमन यांनी केलेली एक पोस्ट महत्वाची आहे. जे म्हणतात, भारताने नुरखान एअरबेसला टार्गेट केल्यानंतर परिस्थिती बिघडायला लागली. जाणता अजाणता पाकिस्तानच्या कमांड-कण्ट्रोल सेंटरला लक्ष्य केले. मोठे नुकसान केले. आणि त्यामुळे कदाचित आता तिथे किरणोत्सर्गाची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धविरामाच्या आधी अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रॉसमन जे काही म्हणाले आहेत, त्याचा संदर्भ सरगोधा हवाईतळावर भारताने केलेल्या हल्ल्याशी आहे. इथेच जवळ किराना हिल्स येथे भारताने जबरदस्त हवाई हल्ला चढवला. इथेच जमिनीखाली पाकिस्तानी अण्वस्त्रांचा तळ आहे. त्याच्या मुखावरच भारताची क्षेपणास्त्र
आदळली.
आपण क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानला ठोकलं त्याच्या कळा अमेरिकेपर्यंत का गेल्या हे ग्रॉसमन यांच्या पोस्टमुळे जगाच्या लक्षात येऊ शकेल. पाकिस्तानचे नऊ हवाई तळ आपण उद्ध्वस्त केले हवेतून जमिनीवर मारा करून हे उद्ध्वस्त केले आणि त्याची अचूकता इतकी जबरदस्त होती की,निशाणा अजिबात इथे तिथे नव्हता जिथे ठोकायचं तिथेच मिसाईल्स आदळली. पाकिस्तानची जबरदस्त तंतरली भारत काहीही करू शकतो हे पाकिस्तानच्या लक्षात आलं. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धोका निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानचे नेते पाकिस्तानचे लष्करी अधिकारी अमेरिकेकडे भीक मागायला लागले.
सेनाधिकाऱ्यांचा पत्रकार परीषदेचा आत्मविश्वास नजरेत भरणारा होता. एअर मार्शल ए.के.भारतीय म्हणाले, ‘आम्ही जी लक्ष्य निवडली, यशस्वीपणे भेदली. जगाने ती पाहीली.’ डीजीएमओ राजीव घई म्हणाले, ‘पाकिस्तान काय करणार आहे, त्याची आम्हाला चिंता नाही. आम्हाला जे करायचे ते आम्ही केले. यापुढे पाकिस्तानने काही दु: साहस केले तर त्याचे परीणाम भयंकर आणि दंडात्मक असतील.’ ‘फिअर्स एण्ड प्युनिटीव्ह’ हे त्यांचे शब्द आहेत. नौदलाबाबत व्हाईस एडमिरल प्रमोद म्हणाले की आम्ही अरबी समुद्रात पूर्ण तयारीने सज्ज आहोत. कोणतीही आगळीक केली तर धडा शिकवू.
भारतातील विरोध पक्ष पुन्हा सरकार विरोधी नरेटीव्ह निर्माण करतो आहे. ज्या नरेटीव्हचा या युद्धा दरम्यानही पाकिस्तानने उपयोग केला. सत्यपाल मलिक, राहुल गांधी, विजय वडेट्टीवार या तमाम आचरट नेत्यांची देशविरोधी विधाने जगासमोर ठेवली. आता युद्ध विरामानंतर ही आचरट जमात पुन्हा चेकाळली आहे. भारत कसा पराभूत झाला, हे दाखवण्यासाठी हा आचरटपणा पुन्हा एकदा वापरला जाणार आहे. भारताच्या तिन्ही सेनादलांनी जे काही केले ते अदभूत होते. जगाने अचंबित होऊ तोंडात बोटे घालावीत असे होते. प्रत्येक भारतीयाने फक्र है, असे म्हणण्यासारखे होते. मारक क्षमतेसोबत अचूकतेचे दर्शन सेनादलांनी घडवले. जो काही चमत्कार आपण केला. त्यात हायपर सोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा, आकाश क्षेपणास्त्रांचा, या युद्धात गवगवा झाला ही भारताची निर्मिती आहे. भारताच्या सामरीक शक्तीची दखल जगाने घेतली आहे. आपण अमेरिकी आणि चिनी विमानांनाही अस्मान दाखवले. एका महासत्तेच्या उदयाची चुणूक या युद्धात दिसलेली आहे.
हा युद्धविराम फार टिकणार नाही. ऑपरेशन सिंदूर थांबलेले नाही, ही स्पष्टोक्ती पुरेशी बोलकी आहे. पाकिस्तानला संपवूनच हे थांबणार आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
