दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठींबा देणाऱ्या तुर्कस्तानचा निषेध म्हणून पुण्यातील व्यापाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तुर्कस्थानवरून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार घालण्याचा निर्णय व्यापाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने हातमिळवणी करत पाकिस्तानला लढण्यासाठी ड्रोन दिले होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तुर्कस्तानमधून येणाऱ्या सफरचंदावर बहिष्कार घालण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत बोलताना एक व्यापारी म्हणाला, तुर्की सफरचंद साधारणता तीन महिने भारतात येतो. सफरचंदासह चेरी, पीच, पलम हे देखील भारतात येते. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला मदत करणे हे चुकीचे होते.
भारताने पाकची कंबरतर तोडलीच. मात्र, आम्ही सुद्धा बॉर्डरवर न जाता देशसेवा म्हणून तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुर्कीची आर्थिक कोंडी होईल आणि त्यानाही कळेल कि पाकिस्तानशी दोस्ती करून भारताशी दुश्मनी केली आहे. यासह भारताची मोठी बाजारपेठ गमावल्याचे त्यांना कळेल.
दुसऱ्या एका व्यापाऱ्याने म्हटले, तुर्की सफरचंदावर बहिष्कार घातला तर भारतातील सफरचंदाना चांगली मागणी येईल. तुर्कीवर जेव्हा भूकंपाचे संकट आले होते तेव्हा सर्वप्रथम भारत त्यांच्या मदतीसाठी धावला होता. भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत ढिगाऱ्यात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी ‘गरुड एरोस्पेस ड्रोन’, ‘औषधे’ आणि अन्न वाहून नेण्यासाठी सुधारित ‘किसान ड्रोन’ पाठवले होते. मात्र, तुर्की आमच्यावरच फिरला. त्यामुळे त्यांच्या सफरचंदावर बहिष्कार टाकला पाहिजे.
हे ही वाचा :
रैना, धवन, दिलशान, गप्टिल पुन्हा मैदानात
उद्या दहावीचा निकाल! कुठे पाहता येईल निकाल?
जोश हेजलवुडची आयपीलएमधून माघार?
भारत-पाकिस्तान संघर्ष: तात्पुरते बंद केलेली ‘ती’ ३२ विमानतळे पुन्हा सुरू!
दरम्यान, हिमाचलमध्ये देखील अशीच मागणी जोर धरू लागली आहे. हिमाचल प्रदेश फ्लॉवर, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरीश चौहान म्हणाले, तुर्कीमधून देशात मोठ्या प्रमाणात सफरचंद आयात केले जातात. याचा परिणाम हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादकांच्या उत्पन्नावर होत आहे. याचा अर्थ असा की, देशातील बाजारपेठेत तुर्की सफरचंद उपलब्ध असल्याने हिमाचल प्रदेशातील सफरचंदांना वाजवी भाव मिळत नाही.
ते पुढे म्हणाले, पाकिस्तानला पाठिंबा देऊन तुर्कीने भारताचा विश्वासघात केला आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी झालेल्या व्यापार करारांचा आढावा घेतला पाहिजे आणि तेथून सफरचंदांसह इतर वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे.
