‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने नष्ट केलेल्या पाकिस्तानी मिराज लढाऊ विमानाचे अवशेष भारतीय सैन्याने दाखवले. त्यानुसार पाकिस्तानी मिराज लढाऊ विमान पाडण्यात आल्याची पुष्टी आज (१२ मे) भारताने केली. नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय पत्रकार परिषदेत, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या वरिष्ठ कमांडरनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ७ मे रोजी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरची विस्तृत माहिती दिली.
लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, एअर ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए.के. भारती आणि नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत घडामोडींचा क्रम सांगितला.
अमेरिका, चीनमधील टॅरिफ वॉर ९० दिवसांसाठी स्थगित
पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ९ आणि १० मे च्या रात्री पाकिस्तानी हवाई हल्ले हाणून पाडण्यात भारताच्या बहुस्तरीय काउंटर-ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली महत्त्वाची होती. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताच्या संरक्षण यंत्रणेने चिनी आणि तुर्की बनावटीचे ड्रोन तसेच ‘पीएल-१५’ क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या नष्ट केली.
भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या दोन पाकिस्तानी हवाई तळांचे दृश्य देखील यावेळी दाखवण्यात आले. एअर मार्शल भारती यांनी भारताच्या स्वदेशी प्रणाली, विशेषतः ‘आकाश’ जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्लॅटफॉर्मच्या मजबूततेवर प्रकाश टाकला. आकाश प्रणालीने उल्लेखनीय कामगिरी केली,” असे ते म्हणाले.
#WATCH | Delhi: While DGMOs briefing, Indian military shows the debris of Pakistani Mirage pic.twitter.com/VQXL5bG8pZ
— ANI (@ANI) May 12, 2025
