भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढल्यामुळे बंद करण्यात आलेले उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ तात्काळ पुन्हा सुरू झाले आहेत. या संदर्भात एक नोटम (विमान कर्मचाऱ्यांना सूचना) जारी करण्यात आली आहे. यापूर्वी, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि इतर विमान वाहतूक नियामकांनी भारताच्या सीमावर्ती भागातील ३२ विमानतळ तात्पुरते बंद करण्यासाठी नोटम जारी केले होते. ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे स्थगित करण्यात आली होती आणि ही स्थगिती ९ मे ते १५ मे पर्यंत लागू होती. आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे की तात्पुरते बंद केलेले विमानतळ तात्काळ सुरू करण्यात आले आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सोमवारी (१२ मे) एका निवेदनात म्हटले, “प्रवाशांनी कृपया लक्षात ठेवा; १५ मे २०२५ रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत ३२ विमानतळांवर नागरी विमानांचे कामकाज तात्पुरते बंद करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. आता हे विमानतळ तात्काळ प्रभावाने नागरी विमानांच्या कामकाजासाठी उपलब्ध असल्याचे कळविण्यात येत आहे.
प्रवाश्यांनी आपल्या विमानाची स्थिती पाहण्यासाठी आणि नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाइट्सचे निरीक्षण करावे, असा सल्लाही प्रवाश्यांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिला आहे.
हे ही वाचा :
अफगाणिस्तानात बुद्धिबळावर बंदी!
नवनीत राणांना पाकिस्तानातून आली धमकी…हिंदू शेरनी जल्दी उडने वाली है!
युद्धविरामानंतर शेअर बाजार तेजीत; ‘हे’ शेअर्स वधारले
भारताकडून मालदीवला ५ कोटी डॉलरची मदत
बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या विमानतळांमध्ये, आदमपुर, अंबाला, अमृतसर, अवंतीपोरा, बठिंडा, भुज, बीकानेर, चंडीगढ़, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपुर, कांडला, कांगड़ा (गग्गल), केशोद, किशनगढ़, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठानकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हीरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोइस आणि उत्तरलई यांचा समावेश आहे. मात्र, भारत सरकारने आता ही बंदी उठवली असून प्रवाशांच्या सेवेसाठी येथील विमाने सज्ज आहेत.
