27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषअफगाणिस्तानात बुद्धिबळावर बंदी!

अफगाणिस्तानात बुद्धिबळावर बंदी!

शरियाविरुद्ध असल्याचे तालिबानचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी जर कोणताही खेळ सर्वोत्तम मानला जात असेल तर तो बुद्धिबळ आहे. जर खेळाडू कुशल असतील तर कधीकधी हा खेळ तासनतास चालू शकतो. प्रत्येक हालचाल विचारपूर्वक केली जाते, म्हणूनच लोक या खेळातील खेळाडूंना बुद्धिमान मानतात. तथापि, जगात असा एक देश आहे जिथे या खेळावर बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानात बुद्धिबळावर बंदी घालण्यात आली आहे. हा खेळ शरियाविरुद्ध असल्याचे सांगत अफगाणिस्तानने त्यावर बंदी घातली आहे. रविवारी (११ मे) तालिबान प्रशासनाने घोषणा केली की पुढील सूचना मिळेपर्यंत अफगाणिस्तानात बुद्धिबळावर बंदी असेल.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, तालिबानने बुद्धिबळावर बंदी घातली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ते खेळणे बेकायदेशीर मानले जाईल. क्रीडा विभागाचे प्रवक्ते अटल माशवानी म्हणाले की, सरकारच्या नैतिकता कायद्यानुसार बुद्धिबळ हा जुगाराचा एक स्रोत मानला जातो आणि शरिया नावाच्या इस्लामिक कायद्यानुसार तो निषिद्ध आहे.

“शरियामध्ये बुद्धिबळ हा जुगाराचा एक प्रकार मानला जातो, जो गेल्या वर्षी लागू झालेल्या सद्गुणांचा प्रचार आणि दुष्कर्म प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बंदी आहे,” असे मशवानी यांनी एएफपीला सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, बुद्धिबळाशी संबंधित धार्मिक चिंता आहेत आणि जोपर्यंत त्या सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत अफगाणिस्तानात हा खेळ बंद राहील.

हे ही वाचा : 

देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारताचे उपग्रह अहोरात्र कार्यरत

ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी ‘हे’ पाक सैन्य अधिकारी होते उपस्थित

नाभा तुरुंगातून पलायन प्रकरणातील प्रमुख खलिस्तानी दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

पाकिस्तानवरील हल्ल्यात ब्रह्मोसचा वापर झाल्याची शक्यता

दरम्यान, तालिबानच्या या निर्णयामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. अजीजुल्लाह गुलजादा यांचे काबूलमध्ये एक कॅफे आहे, त्यांनी अलिकडच्या वर्षांत बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या खेळाचे जुगराशी सबंध असल्याचे नाकारले आणि इतर मुस्लिम बहुल देशांमध्ये बुद्धिबळ खेळला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा