27.6 C
Mumbai
Tuesday, June 24, 2025
घरक्राईमनामानवनीत राणांना पाकिस्तानातून आली धमकी...हिंदू शेरनी जल्दी उडने वाली है!

नवनीत राणांना पाकिस्तानातून आली धमकी…हिंदू शेरनी जल्दी उडने वाली है!

भाजपा महिल नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी 

Google News Follow

Related

भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात, भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या फोन नंबरवरून देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी या प्रकरणी मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाठवलेल्या धमकीच्या संदेशात असे म्हटले आहे की, “हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली तू थोड़े दिन की मेहमान है, जल्दी उड़ने वाली है.” आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून या धमक्या मिळाल्या असल्याने, मुंबई पोलिस इतर एजन्सींच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महाराष्ट्रातील अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानकडून धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर एका व्हिडिओ क्लिपद्वारे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.

हे ही वाचा : 

भारतीय सेनेने दाखवले अदम्य शौर्य

डीजीएमओच्या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारताचे उपग्रह अहोरात्र कार्यरत

ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी ‘हे’ पाक सैन्य अधिकारी होते उपस्थित

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटले होते, “घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है. दिल्ली की गद्दी पर तुम्हारा बाप मोदी बैठा है. बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, चुन-चुन कर मारेंगे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उघडपणे कौतुक केले आणि म्हटले की, घरात घुसून मारणे म्हणजे काय असते हे पंतप्रधान मोदींनी जगाला दाखवून दिले. दरम्यान, नवनीत राणा यांना मिळालेल्या धमकीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. धमकी देणाऱ्या लोकांची ओळख पटविण्यासाठी संबंधित एजन्सींशी संपर्क साधत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
253,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा