भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अजूनही असून सध्या हल्ले थांबली असली तरी याचा परिणाम आता शेअर बाजारावरही दिसून येऊ लागला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी हल्ल्यांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आणि यानंतर झालेल्या शस्त्रविरामानंतर शेअर बाजारात उसळी दिसून आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार आज मोठ्या तेजीसह उघडला आहे.
सेन्सेक्स २,२५६.९१ (२.८४%) अंकांनी वाढून ८१,७१६.१३ अंकांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, निफ्टीने ७०५.१६ (२.९४%) अंकांची वाढ नोंदवून २४,७१३.१५ च्या पातळीवर पोहोचला. बाजार उघडताच बाजारात मोठी खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर्स वधारले. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात २.९० टक्के किंवा ६९६.४० अंकांच्या वाढीसह २४,७०४.४० वर व्यवहार करताना दिसला.
सेन्सेक्समधील अदानी पोर्ट्समध्ये सर्वाधिक ४.४३ टक्के वाढ झाली आहे. यानंतर, अॅक्सिस बँक ३.७० टक्के, बजाज फायनान्स ३.५३ टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.४४ टक्के, झोमॅटो ३.४१ टक्के, पॉवरग्रिड ३.२४ टक्के, लार्सन अँड टुब्रो ३.४८ टक्के, एनटीपीसी ३.२६ टक्के, रिलायन्स ३.०१ टक्के, टाटा स्टील २.८० टक्के, इन्फोसिस २.७५ टक्के, एचडीएफसी बँक २.७३ टक्के, कोटक बँक २.५६ टक्के, एसबीआय २.२८ टक्के आणि टीसीएस २.०४ टक्के वधारले आहेत. दुसरीकडे, आठवड्याच्या अखेरीस अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध शमण्याच्या दिशेने चर्चा होत असल्याने बाजारात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारताचे उपग्रह अहोरात्र कार्यरत
नाभा तुरुंगातून पलायन प्रकरणातील प्रमुख खलिस्तानी दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या
ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले, पाकचे ३५-४० सैनिक मृत्यूमुखी, पाकची जेटही पाडली!
सीमेपलीकडून काही दिवसांपासून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे बाजाराला चांगली चालना मिळाली. आठवड्याच्या शेवटी झालेल्या घडामोडींमुळे बाजार तेजीत असल्याचे संकेत जवळजवळ सर्वच विश्लेषकांनी दिले होते.
