31.1 C
Mumbai
Sunday, June 7, 2026
घरसंपादकीयआंदोलनजीवींना दिसले नाही, ते इंटेलला दिसले...झुरळं आलीत, चप्पल काढा!

आंदोलनजीवींना दिसले नाही, ते इंटेलला दिसले…झुरळं आलीत, चप्पल काढा!

Google News Follow

Related

कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके आज अमेरिकेतून दाखल झाला. त्याने २२ एप्रिल रोजी केलेल्या एका ट्वीटमध्ये त्याची लायकी दाखवून दिली आहे.  ‘जग जेव्हा क्लीन एनर्जी, एआय आणि सेमी कण्डक्टरकडे वळत होते, त्या काळात आपली गेली १२ वर्षे मात्र या गाय-गोबर पॉलिटीक्समुळे वाया गेली. या सडलेल्या भगव्यांनी देशाला ७० मागे नेले.’ या मूर्खाला माहितीच नाही, या देशात सेमी कण्डक्टरबाबत जे काही घडले ते गेल्या १२ वर्षातच, त्या आधी ठणठण गोपाळ होते. आज मोदी सरकारच्या कामगिरीमुळे एका खाजगी कंपनीने सेमी कण्डक्टर क्षेत्रात असा कारनामा केला आहे, ज्यामुळे जगभरात भारताचे कौतूक सुरू आहे. झुरळांना डोळे असतात, परंतु त्यांना स्पष्ट दिसत नाही, दिपके नावाच्या झुरळाने हे दाखवून दिले आहे.

आंदोलन करणे, उपोषण करणे हा आपल्या देशात धंदा झाला आहे. याच धंद्यावर ज्यांची गुजराण होते, असे आंदोलनजीवी या देशात झुरळांसारखे वेगाने वाढतायत. त्यामुळे प्रत्येक देशभक्तला चप्पल काढून तयार राहावे लागेल. दिपकेला गायीची एलर्जी आहे, भगव्याची एलर्जी आहे. देशात गुजराती मुस्लीम पंतप्रधान का झाला नाही? असे प्रश्न पडतात. त्यामुळे त्याची लायकी काय हे स्पष्ट होतेच. त्याला एवढेही ठाऊक नाही की, सेमी कण्डक्टर, क्लीन एनर्जी, एआयच्या प्रांतात देश जो काही चार पावले पुढे गेला तो गेल्या १२ वर्षातच. भारतात २०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्टार्टअपने अशी कमाल केली आहे की, जगातील बड्या टेक कंपन्या कौतुक करतायत. दिपके आंदोलनजीवी असल्यामुळे त्याला हे दिसत नाही.

सेमी कण्डक्टर या शब्दातला स सुद्धा २०१४ पूर्वी अस्तित्वात नव्हता. मोदी सरकारने २०१५ मध्ये देशात इंडिया सेमी कण्डक्टर मिशन १.० राबवले. २०२६ मध्ये इंडिया सेमी कंडक्टर मिशन २.० ची घोषणा करण्यात आली. या दोन्हीचा परिणाम इतका जबरदस्त आहे की, २०२६ च्या अखेरपर्यंत देशात सेमी कण्डक्टर चीपचे घाऊक उत्पादन होणार आहे. कित्येक स्टार्टअप्सनी या क्षेत्रात भरारी घेतली आहे. C2i सेमी कण्डक्टर्स या स्टार्टअपने तयार केलेल्या सेमी कण्डक्टर चीपुमुळे जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानविरुद्ध भारताची दमदार मुसंडी!

चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला

मृत महिलांचे फोटो काढून व्हॉट्सॲपवर प्रसारित

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या दिशेने मोठी झेप

भारतीय स्टार्टअप C2i  एआय़ डेटा सेंटरसाठी स्मार्ट पॉवर डेट चीपची निर्मिती केली आहे. हे यश केवळ भारतासाठी नव्हे तर जागतिक एआय उद्योगासाठीही महत्त्वाचे आहे. या चिपची डिझाइन आणि निर्मिती पूर्णपणे भारतात आणि एका भारतीय स्टार्टअपने केली असल्यामुळे जग  अचंबित झाले आहे.

डेटा सेंटर चालवण्यासाठी लागणारी वीज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेची समस्या किती गंभीर आहे, याबाबत काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या यूटॉ स्टेट युनिवर्सिटीतील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ.रॉब डेव्हीस यांनी धक्कादायक खुलासा केला होता. ९ गिगावॅटच्या डेटा सेंटरमधून १६ गिगावॅट थर्मल एनर्जी म्हणजे उष्णता बाहेर पडू शकते. डेटा सेंटरमधून दिवसाच्या २४ तासात उत्सर्जित होणाऱी उष्णता अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बच्या तुलनेत २३ पट असते. डेव्हीस अणुबॉम्बशी डेटा सेंटरची जी तुलना करतायत, त्याचा संदर्भ फक्त उष्णतेपुरता मर्यादीत आहे. फरक एवढाच की अणुबॉम्बमधून काही सेकंदात इतक्या ऊर्जेचे उत्सर्जन होते, तर डेटा सेंटरमधून ही उष्णता निर्माण व्हायला २४ तासांचा अवधी लागतो. एका डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागाचे तापमान २ अंश सेल्शिअसने वाढते. ही आकडेवारी पाहून तुमच्या लक्षात येऊ शकेल की C2i ने विकसित केलेली सेमी कण्डक्टर चीप जगासाठी वरदान का आहे.

डेटा सेंटरमध्ये वीज एआय चीप्सपर्यंत थेट पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचताना बऱ्याच उपकरणातून वीजेचा प्रवास होतो. तेव्हा गरजेनुसार वीजेचे व्होल्टेज (दाब) कमी जास्त केले जातात. या प्रक्रीयेत वीज वाया जाते. ही वाया जाणारी वीज उष्णता निर्माण करते.

घरगुती उदाहरणाने हे समजून घेता येईल. मोबाईल चार्ज करताना चार्जर गरम होतो. कारण तुमच्या घरात येणारी वीज २३० व्होल्टने (दाबाने) येते. मोबाईल चार्ज करण्यासाठी फक्त ५ ते ९ व्होल्टची आवश्यकता असते. विजेचा दाब कमी करताना काही वीज वाया जाते. त्यामुळे तुमचा चार्जर तापतो. डेटा सेंटरमध्ये तेच होते. १५ ते २० टक्के वीज वीजप्रवाह कमी जास्त करताना वाया जाते. ही वीज वाया जाणार नाही, असे तंत्रज्ञान C2i ने विकसित केले आहे. या चीपमुळे प्रोसेसरचे तापमान ४ अंश सेल्शिअसने कमी होणार आहे. एनविडीया, ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट, इंटेल अशा बड्या कंपन्यांना याचा फायदा होणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे डेटा सेंटरमध्ये वीजेचा खर्च कमी होईल. कुलींगचा खर्च कमी होईल. कोट्यवध डॉलर्सची बचत होईल. जीपीयूची कार्यक्षमता वाढेल.

भारत फक्त चिप डीझाईन पुरता मर्यादित नाही तो डीझाईनसोबत निर्मितीही करू शकतो हे C2i ने सिद्ध केले आहे. दृष्टी मंदावलेले दीपकेसारखे कोकरोच असा युक्तवाद करू शकतात की, ही कामगिरी तर एका स्टार्टअपची आहे. मोदी सरकारची त्यात भूमिका काय? तर याचे उत्तर असे आहे की, भारत सरकारच्या डीझाईन लिंक्ड इंन्सेटीव्ह (डीएलआय) या उपक्रमाच्या अंतर्गत C2i या कंपनीला आर्थिक आणि तंत्रज्ञान पाठबळ मिळाले आहे. कंपनीचे सह संस्थापक आणि सीईओ राम अनंत, सहसंस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी प्रितम ताडेपर्थी, कंपनीचे संचालक आणि सहसंस्थापक विक्रम गाखर यांनी जून २०२४ मध्ये ही कंपनी स्थापन केली आणि वर्षभरात हा चमत्कार केला. त्यांच्या कंपनीत सेमी कण्डक्टर क्षेत्रातील ६० गुणी तंत्रज्ञ आहेत.

डोक्यात गोबर भरलेल्यांना भारताचे यश दिसत नाही. मोदी सरकारचे यश दिसत नाही. ते कायम जगभरात देशाची बदनामी करण्याचा प्रय़त्न करतात. वैयक्तिक आयुष्यात अपयशी ठरलेल्यांना देशातील तरुणांना आवाज बनवण्याचा प्रयत्न मीडियाही करतोय. अभिजित दिपकेच्या स्वागतासाठी जनसागर उसळला. हा एबीपी माझा या मराठी वृत्तवाहीनीचा मथळा आहे. त्यांना राम अंनत, विक्रम गाखर आणि प्रीतम ताडेपर्थी कोण आहेत, हे माहितीही नसेल. त्यांच्या यशाची चर्चा करण्याची गरज या मीडीयातील झुरळांना वाटत नाही. देशात जे काही चांगले घडते आहे, त्याकडे सतत पाठ फिरवायची आणि झुरळांना डोक्यावर घ्यायचे ही मीडियाची नीती आहे. त्यांच्या दुर्दैवाने कॉर्पोरेट जग भारताकडे कौतूकाने पाहाते आहे. इंटेलचे माजी सीईओ पॅट गेल्सिंगर यांनी स्वत: C2i  या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ते या कंपनीचे सल्लागारही आहेत. इंटेलचे सीईओ लिप बू तान ज्यांना सेमी कण्डक्टर इंडस्ट्रीत एक दंतकथा म्हणून ओळखले जाते, ते  C2i च्या बोर्ड ऑफ लीडर्सचे सदस्य आहेत.

इंटेलने झिऑन ६ या नेस्क्ट जनरेशन वेगवान प्रोसेसरची निर्मिती केली आहे. वेग वाढला तर उष्णताही जास्त निर्माण होते. त्याला थंड ठेवण्यासाठी वीजेची प्रचंड गरज लागणार आहे. तिथे C2i ची ही सेमी कण्डक्टर चीप उपयुक्त ठरणार आहे. एपल सारख्या कंपन्यांना बॅटरी आणि इतर सुटे भाग पुरवणाऱ्या टीडीके व्हेंचर्स या कंपनीने C2i मध्ये १६.७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. C2i अमेरिकी कंपन्यांना सेवा देण्यासाठी लवकरच अमेरिकेत भव्य कार्यालय थाटणार आहे.

भारताने ही भरारी जशी सेमी कण्डक्टरच्या क्षेत्रात घेतली आहे, तशीच भरारी क्लिन एनर्जीच्या क्षेत्रात घेतली आहे. एआयच्या क्षेत्रात घेतली आहे. दिपकेला फक्त गोबर दिसते, त्याचे कारण डोक्यात गोबर भरले आहे. त्याही पेक्षा महत्वाचे कारण म्हणजे भगव्याची एलर्जी. या देशाला दिपकेची नाही, राम अनंत, विक्रम बाखर आणि प्रितम ताडेपर्थीची जास्त गरज आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
311,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा