28.9 C
Mumbai
Tuesday, July 14, 2026
घरसंपादकीयतिसरा सापडला, सीआयए भारतात शिजवतेय काय?

तिसरा सापडला, सीआयए भारतात शिजवतेय काय?

Google News Follow

Related

भारताच्या नेपाळला लागून असलेल्या सीमेवर ११ जुलै रोजी जॉर्डन ब्राऊन या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. हा कधी काळी अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचा कमांडो होता. दोन वर्षापूर्वी तो सेवेतून बाहेर पडला. काही आठवडे तो पासपोर्ट आणि अन्य वैध कागदपत्रांशिवाय भारतभर भटकत होता. त्याचा एकूणच व्यवहार संशयास्पद आहे. मॅथ्यू व्हॅन डीक आणि मिकाह मार्कच्या याच्या अटकेनंतर अमेरिकी सुरक्षा यंत्रणांशी संबंधित हा तिसरा संशयित भारतात सापडला आहे. सीआयए नक्कीच भारतात काही तरी शिजवण्याच्या प्रयत्नात आहे.

उत्तर प्रदेशातील सोनौली हा भाग नेपाळच्या सीमेला लागून आहे. इथल्या चेकपोस्टमधून दोन्ही देशातील लोक, वाहने येजा करतात. ११ जुलै रोजी स्थानिक रहीवाशांशी जॉर्डन ब्राऊन याचे काही खटके उडाले. लोकांनी पकडून त्याला चांगलेच बडवले. लोकांना त्याचा संशय आला असावा. त्यानंतर सीमा सुरक्षा बलच्या जवानांकडे सोपवण्यात आले. इथून त्याची झाडाझडती सुरू झाली. चौकशीत अनेक धक्कादायक तपशील बाहेर आले आहेत.

हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहीवाशी. सहा वर्षे तो अमेरिकी नौदलाच्या स्पेशल फोर्समध्ये काम करत होता. नेव्ही सील म्हणजे आपल्या फोर्स वन किंवा एसपीजी कमांडों इतके प्रशिक्षित असतात. अत्यंत खडतर प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले असते. त्याने दावा केला की थायलंडमध्ये असताना त्याचा पासपोर्ट हरवला. तिथून तो श्रीलंकेत गेला. समुद्र मार्गे गोव्यात दाखल झाला. तो श्रीलंकेतही समुद्र मार्गे आला असणार. सहा आठवडे तो गोव्यात राहात होता. त्याला कोणीही हटकले नाही. त्याने दिलेली माहिती अत्यंत उलट सुलट आहे. एकदा त्याने आपण बालीहून गोव्यात आलो असेही सांगितले आहे. थेट अमेरिकेतून गोव्यात गेलो असेही त्याने सांगतले आहे. तो सतत विधाने बदलतो आहे.

आपला पासपोर्ट बंगळुरुतील एका मित्राकडे असल्याचे त्याने सांगितले. पासपोर्टबाबत हे त्याचे दुसरे विधान. एका विधानात पासपोर्ट थायलंडमध्ये हरवल्याचेही त्याने सांगितले आहे. नेपाळमध्ये त्याचा नाझ नावाचा मित्र असून आपण त्याला भेटायला जात होतो, असेही तो म्हणाला आहे.

हे ही वाचा:

युद्धाच्या धगधगत्या वातावरणात सोन्याची दमदार उसळी

शेअर बाजाराला ब्रेक; सेन्सेक्स ५७० अंकांनी घसरला

२६/११ ते पहलगामचा मास्टरमाईंड हाफिज सईद विरोधात अजामीनपात्र वॉरंट

ट्रम्प यांच्या २०% टोल प्रस्तावाने जागतिक बाजार हादरला

जॉर्डन ब्राऊनच्या वेगवेगळ्या विधानात अनेक विसंगती आहेत. त्याचा पासपोर्ट हरवला, परंतु त्याच्या कडे असलेल्या रोख रकमेला मात्र कोणी हात लावला, नाही. त्याचे दोन मोबाईल फोनही कोणी लांबवले नाहीत. पासपोर्ट हरवल्यानंतर हा अमेरिकी दुतावासाशी संपर्क न करता दोन महिने भारतात मस्त भटकत होता. सर्वाधिक काळ होत गोव्यात होता. तो पहील्यांदा भारतात आला नसावा. कारण त्याची पत्नी उत्तराखंडची असून तीन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला. त्यांची भेट इटलीमध्ये झाली होती. यापूर्वी सुद्धा तो अनेकदा भारतात आला असावा. ७० देश फिरलेला हा इसम आहे. त्याची शरीरयष्टी एखाद्या कमांडोला साजेशी आहे.

मॅथ्यू व्हॅन डीक प्रमाणे हा जॉर्डनही एखाद्या मोहीमेसाठी भारतात आला असण्याची शक्यता आहे. व्हॅनडीकला कोलकात्यात अटक झाली होती. तोही म्यानमार सीमेतून भारतात बेकायदेशीररित्या शिरला होता. त्याच्यासोबत त्याच्या सहा युक्रेनियन साथीदारांनाही अटक करण्यात आली. म्यानमारमधील बंडखोरांना प्रशिक्षण देण्याचे काम तो करत होता. त्याचा संबंध सीआयएशी असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. यूएपीए अंतर्गत त्याला अटक करण्यात आली सध्या तो तिहार जेलमध्ये आहे. सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत तो जगभरातील सरकारविरोधी बंडखोर गटांशी संबंधित होता.

व्हॅनडीक भारतात का आला होता, याबाबत उलगडा झालेला आहे. तो इशान्य भारतात कार्यरत होता. इशान्य भारतात अराजक निर्माण करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, त्यांना हवा देण्याचे काम तो आणि त्याच्या सोबत अटक कऱण्यात आलेले युक्रेनियन साथीदार करत होते. एप्रिल २०२६ मध्ये मिकाह मार्क या अमेरिकी नागरीकाला बंगळुरु विमानतळावर अटक कऱण्यात आली. त्याच्याकडे ट्रुईस्ट बॅंकेची २४ आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड सापडली. ही अमेरिकी बॅंक आहे. भारतातला नक्षलवाद खणून काढण्यात केंद्र सरकारला यश आलेले आहे. नक्षलवाद्यांना पूर्वी एनजीओंच्या माध्यमातून जे डॉलर्सचे टॉनिक जायचे ते आता एफसीआरए कायदा कठोर केल्यामुळे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांनी वेगळा मार्ग शोधला आहे. आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डच्या माध्यमातून देशभरात पैसा वाटण्यात आला. छत्तीसगढच्या बस्तर, धमतारी सारख्या दुर्गम भागांपर्यंत पैसा पोहचवण्यात आला. सुमारे ९५ कोटी रुपयांचे वाटप या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून झाले.

भारतात गोरे लोक पाहायला मिळणे ही काही दुर्मिळ बाब नाही. परंतु आधी व्हॅनडीक नंतर मिकाह मार्क, आणि आता जॉर्डन ब्राऊन यांच्या अटकेनंतर ट्रम्प यांनी किती गोरे भारतात सोडले आहेत, असा सवाल निर्माण झाला आहे. मिकाह कायदेशीर मार्गाने आला, व्हॅनडीक आणि मिकाह हे दोघे पासपोर्ट शिवाय भारतात आले. दोघांनीही भारतात घुसखोरी केली. भारतात येण्यापूर्वी दोघेही जगातील अनेक देशात फिरले होते. दोघांची पार्श्वभूमी संशयास्पद आहे.

जॉर्डन ब्राऊनचे प्रकरण हे गेल्या सहा महिन्यात उघड झालेले तिसरे प्रकरण आहे. त्याने भारतात घुसखोरी का केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

जो पर्यंत तपास यंत्रणांना उत्तराखंडमध्ये राहणारी त्याची पत्नी, बंगळुरुमध्ये राहणारा त्याचा मित्र आणि नेपाळमधील त्याचा नाझ नावाचा संपर्क यांचा ठावठिकाणा मिळत नाही, तोपर्यंत याचे भारतात घुसखोरी करण्याचे रहस्य उलगडू शकत नाही. ब्राऊनने सांगितलेल्या काही गोष्टी मात्र तपास यंत्रणांचे कान उभे करणाऱ्या आहेत. हा माणूस थायलंडहून समुद्रमार्गे कसा आला? तिथून गोव्यात कसा गेला?  मच्छीमार बोटीतून  दोन्ही ठिकाणी तो गेला असेल आणि तटरक्षक दलाची नजर न पडता भारतात दाखल झाला असेल तर येत्या काळात आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गोव्यात हा माणूस सहा आठवडे राहिला ही बाब त्याही पेक्षा जास्त धक्कादायक. गोव्यात गोऱ्या कातडीचे अनेक विदेशी नागरीक मौजमजा करायला येतात. त्यामुळे तिथे ड्रग्जचा धंदा व्यवस्थित रुजला आहे. अनेक रशियन इथे राहतात. अनेकांनी स्थानिक तरुणींशी विवाह करून जमिनी खरेदी केल्या आहेत. मालमत्ता बनवलेल्या आहेत. त्यामुळे हा जॉर्डन ब्राऊन तिथे दिड महिना सहज काढू शकतो. या काळात त्याने काय केले. तो कुणाकुणाला भेटला याचा तपशील तपासा दरम्यान उघड होईलच.

गेल्या काही काळात अमेरिकेचे धोरण भारत विरोधी राहिलेले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून यूएसएडने भारतात प्रचंड पैसा पाठवला होता, याचा उलगडा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी जो बायडन यांच्या भारतविरोधी मनसुबा उघडा पाडला. ट्रम्प भारतात काय काय करतायत याचा गौप्यस्फोट बहुधा ट्रम्प यांच्यानंतर सत्तेवर येणारा राष्ट्राध्यक्ष करू शकतो.

अमेरिकेला म्यानमार आणि भारताच्या इशान्येतील एखादा तुकडा तोडून म्यानमार आणि भारताच्या दरम्यान एक ख्रिस्ती राष्ट्र बनवायचे आहे. बांगलादेशमध्येही त्यांना तळ हवा आहे. हे सगळे चीनवर नजर ठेवण्यासाठी चालले आहे, असे दाखवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असला तरी भारत हाच त्याचे लक्ष्य आहे. व्हॅनडीक आला होता इशान्य भारतात आग पेटवण्यासाठी, मिकाह मार्कला नक्षलवाद्यांना रसद पोहोचवायची होती. जॉर्डन ब्राऊन नेमक्या कोणत्या कामगिरीवर होता, हे येत्या काही दिवसात उघड होईल. परंतु या सगळ्यांच्या अटकेमुळे सीआयए भारतात प्रचंड सक्रीय झालेली आहे. फुटीरवाद्यांना एकत्र करण्याच्या, त्यांना बळ देण्याच्या मोहिमेवर आहे, ही गोष्ट मात्र उघड होते आहे. अमेरिका इराण सोबत एका अत्यंत कठिण युद्धात गुंतलेला असतानाही भारतातील या कारवाया सातत्याने आणि चढत्या क्रमाने सुरू आहेत, हे महत्वाचे आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा