जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्य अमेरिकेकडे; भारतीय लष्कर चौथ्या स्थानी!

‘ग्लोबल फायरपॉवर’ २०२४ची यादी प्रसिद्ध

जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्य अमेरिकेकडे; भारतीय लष्कर चौथ्या स्थानी!

भारतीय लष्कराने जगभरातील सर्वांत शक्तिशाली सैन्यदलात चौथे स्थान मिळवले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ग्लोबल फायरपॉवर’ २०२४च्या यादीत सर्वांत शक्तिशाली सैन्यदलाची माहिती देण्यात आली आहे. या यादीत अग्रस्थानी अमेरिका आहे. तर, पाकिस्तान नवव्या स्थानी आहे. सर्वांत कमी शक्तिशाली सैन्यदलाच्या यादीत भूतानचाही समावेश आहे.

हे आहेत पहिले पाच देश
‘ग्लोबल फायरपॉवर मिलिट्री स्ट्रेन्थ रँकिंग २०२४’च्या यादीत सर्वांत पहिल्या स्थानी अमेरिका आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी सध्या युक्रेनशी युद्ध करणारा रशिया आहे. तर, तिसऱ्या सर्वांत शक्तिशाली सैन्यदलाचा किताब चीनला मिळाला आहे. त्यानंतर या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानी दक्षिण कोरिया आहे. सहाव्या स्थानावर ब्रिटन तर, जपान सातव्या, तुर्की आठव्या, पाकिस्तान नवव्या आणि इटली दहाव्या स्थानावर आहे.

हे ही वाचा:

भारतीय संघासाठी चांगली बातमी! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत!

ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!

राम लल्लाच्या तीन मूर्तींबद्दल चंपत राय यांनी दिले स्पष्टीकरण!

राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होणार

सर्वांत कमी शक्तिशाली देश
सर्वांत कमी शक्तिशाली सैन्यदल असणाऱ्या देशात भूताने अग्रस्थान पटकावले आहे. तर, दुसऱ्या स्थानी मोल्दोवा, तिसऱ्या स्थानी सुरीनामे हा देश आहे. त्यानंतर सोमालिया, बेनिन, लायबेरिया, बेलीज, सियेरा लियोन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि १०व्या क्रमांकावर आइसलँड आहे.

अशी तयार झाली यादी
ग्लोबल फायरपॉवरने १४५ देशांच्या लष्कराबाबत माहिती मागवली होती. सैनिकांची संख्या, लष्करी साहित्य, आर्थिक स्थिरता आणि संसाधनांसह ६० क्षेत्रांच्या आधारे याचे मूल्यांकन केले गेले. या सर्वांचा साकल्याने विचार करून श्रेणी तयार करण्यात आली आहे.

Exit mobile version