भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएलमधून व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पंत याने डिसेंबर २०२२मध्ये झालेल्या गाडीच्या दुर्घटनेनंतर स्वतःच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. ऋषभ याने मंगळवारी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमच्या नेट्सवर २० मिनिटे फलंदाजी केली. हा सराव करून त्याने त्याचा फिटनेस चांगला झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर त्याने भारतीय संघाच्या खेळाडूंचीही भेट घेतली. पंत याने यावेळी विराट कोहली याच्याशी दीर्घकाळ चर्चा केली.
भारतीय संघ येथे सराव करण्याकरिता पोहोचण्यापूर्वी ऋषभ याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फलंदाजी केली. त्यांनी भारतीय संघाचे ‘साइड आर्म’ विशेषज्ञ रघु यांच्याशीही चर्चा केली. तसेच, त्याने कोहली यांच्यासह फलंदाज रिंकू सिंह याच्याशीही चर्चा केली. बीसीसीआयने ऋषभची ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.डिसेंबर २०२२मध्ये गाडीच्या अपघातात ऋषभ जखमी झाला होता. आता तो त्याचा गमावलेला फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी एनसीएमध्ये कठोर मेहनत घेत आहे.
हे ही वाचा:
ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!
राम लल्लाच्या तीन मूर्तींबद्दल चंपत राय यांनी दिले स्पष्टीकरण!
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होणार
इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त
त्यामुळे तो इंडियन प्रिमीअर लीगमध्ये सहभागी होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्याची दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सराव शिबिरातही भाग घेतला होता. तो डिसेंबरमध्ये दुबईत झालेल्या लिलावादरम्यान फ्रेंचायची टीमसोबतही उपस्थित होता.
यष्टीरक्षणापासून लांब राहण्याची शक्यता
पाठीच्या आणि पायाच्या दुखण्यामुळे ऋषभ हा यष्टीरक्षणापासून लांब राहण्याची शक्यता आहे. तो सुरुवातीच्या काही सामन्यात यष्टीरक्षण करणार नाही, असे सांगितले जात आहे. अर्थात, त्याच्या फिटनेस टेस्टचा अहवाल आल्यानंतरच त्यांची टीम याबाबतचा निर्णय घेईल. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ अर्थात बीसीसीआयच्या मंजुरीनंतरच तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकेल.