‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’: स्वदेशीसाठी भाजपचा तीन महिन्यांचा उपक्रम!

२५ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान राबविणार मोहिम

‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’: स्वदेशीसाठी भाजपचा तीन महिन्यांचा उपक्रम!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यानंतर, भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे. याच दरम्यान, भाजपा तीन महिन्यांचे ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’ राबवणार आहे. ही मोहीम दोन टप्प्यांत देशभरात राबवली जाणार असून, ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळकटी देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही मोहीम २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून सुरू होणार असून, २५ डिसेंबर २०२५ रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी संपन्न होईल. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती केली जाईल आणि नागरिकांना ‘वोकल फॉर लोकल’चे आवाहन करण्यात येणार आहे.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व पक्षीय घटकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भरतेच्या आवाहनाचे देशभर पडसाद उमटत आहेत. भारतीय लग्नस्थळांना लोकप्रिय करणे, भारतीय पर्यटन स्थळांना भेट देणे, पंतप्रधानांच्या “गो व्होकल फॉर लोकल” या आवाहनाला देशभरात प्रतिसाद मिळाला आहे. धोरणात्मक आणि आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भरता हा एक महत्त्वाचा शब्द आहे.”

“आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान” बद्दल नागरिकांना जागरूक करणे आणि त्यांना स्वदेशी उत्पादने वापरण्याची शपथ घेण्यास आणि स्वदेशी नीतिमत्तेवर आधारित सामाजिक जीवन स्वीकारण्यास प्रेरित करणे हा यामागील प्रयत्न आहे. तसेच, लोगो स्थानिक भाषांमध्ये असावेत आणि प्रत्येक दुकानात वितरित केले जावेत, अशी माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली.

हे ही वाचा : 

भारताची अफगाणिस्तानला भक्कम साथ; भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात!

जरांगेना मैदान रिकामे करण्याची नोटीस!

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?

ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे, जसे कि व्यापारी संमेलने, उद्योग संमेलने, प्रभातफेरी आणि नुक्कड नाटक आणि मशाल यात्रा, किसान पदयात्रा. सरकारी विभाग, स्थानिक संस्था, उद्योग आणि व्यापार संघटना, व्यावसायिक आणि सामाजिक संघटना, धार्मिक आणि सांस्कृतिक नेते, युवा आणि महिला संघटना, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती नियोजनबद्ध आणि मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. सण लक्षात घेऊन, नेत्यांना उत्सवांदरम्यान स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे.
Exit mobile version