भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीबाबत बांगलादेशाचे विधान, काय म्हणाले युनुस!

ट्वीटकरत दिली प्रतिक्रिया 

भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीबाबत बांगलादेशाचे विधान, काय म्हणाले युनुस!

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव कमी झाला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे, परंतु असे असूनही, पाकिस्तानने शनिवारी (१० मे) रात्री भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ले केले, जे हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. तथापि, आता सध्या नियंत्रण रेषेवर आणि सीमावर्ती राज्यांमध्ये शांतता आहे. याच दरम्यान, भारताच्या शेजारील देश बांगलादेशने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे बांगलादेशने स्वागत केले आहे. यासोबतच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे आणि भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीच्या कथित कामगिरीचेही कौतुक केले आहे.

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस एक्सवर ट्वीटकरत म्हणाले, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि सचिव रुबियो यांच्या प्रभावी मध्यस्थीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. बांगलादेश आपल्या दोन्ही शेजारी देशांना राजनैतिक मार्गाने मतभेद सोडवण्यासाठी पाठिंबा देत राहील,” असे युनूस यांनी एक्सवर लिहिले.

हे ही वाचा : 

आयपीएलची रंगत पुन्हा पेटणार!

ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीवर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा!

भारताने पाकिस्तानात घुसून हल्ले केल्याचे जगाने पाहिलंय!

ऑस्ट्रेलियात तिहेरी शतक झळकावणारे पहिले क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं निधन

दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सुरु केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरूच असल्याचे भारताच्या हवाई दलाने म्हटले आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील भारतीय हवाई दलाने केले आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान मधील ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचे मुख्य कमांडर मारले गेले आहेत. दरम्यान, भारताने युद्धबंदीवर सहमतीवर दर्शवली असली तरी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version