बेंगळुरू, मुंबई, दिल्ली जगातील टॉप रेसिडेन्शियल मार्केटमध्ये

बेंगळुरू, मुंबई, दिल्ली जगातील टॉप रेसिडेन्शियल मार्केटमध्ये

भारतीय प्रमुख निवासी बाजारपेठा अनेक जागतिक प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. सोमवारी आलेल्या एका अहवालानुसार, बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली या ४६ आघाडीच्या जागतिक शहरांमध्ये टॉप १५ मध्ये स्थान मिळवलं आहे. नाईट अँड फ्रँक यांनी आपल्या अहवालात सांगितलं की, जागतिक स्तरावर प्रमुख निवासी मालमत्तांच्या किंमतींमध्ये घट होत असतानाही भारतीय शहरे मजबूत राहिली आहेत. यामागे ठोस मागणी, मर्यादित प्राईम सप्लाय आणि शहरी केंद्रांमधील सातत्यपूर्ण संपत्ती निर्मिती हे घटक आहेत.

अहवालानुसार, बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली यांची वार्षिक वाढ दर अनुक्रमे १०.२ टक्के, ८.७ टक्के आणि ३.९ टक्के आहे. बेंगळुरू जगभरात चौथ्या स्थानावर, तर मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे सहाव्या आणि पंधराव्या स्थानावर राहिली. नाईट फ्रँक इंडिया चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर शिशिर बैजल यांनी सांगितलं, “भारताच्या प्रमुख निवासी बाजारपेठांनी लक्षणीय प्रगती आणि स्थिरता दर्शवली आहे. जागतिक विकासाचा वेग मंदावलेला असतानाही या बाजारपेठांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बेंगळुरूचं टेक-ड्रिव्हन वेल्थ क्रिएशन, मुंबईचं नव्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे वाढलेलं आकर्षण आणि दिल्लीची स्थिर लक्झरी डिमांड यांनी भारताला जागतिक प्रकाशझोतात ठेवलं आहे.”

हेही वाचा..

सलोनी हार्ट सेंटर हजारो कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण करतेय नवी आशा

दिल्ली विमानतळ : १०.९ कोटी प्रवासी क्षमतेसह ग्लोबल ‘१०० मिलियन प्लस’ क्लबमध्ये दाखल

दिवाळीपूर्वी कार आणि दुचाकी होऊ शकते स्वस्त

पाण्यात अडकलेल्या मुलांना पोलिसांनी दिला मदतीचा हात!

बैजल पुढे म्हणाले की, सातत्यपूर्ण आर्थिक स्थिरता, शहरी पुनर्विकास आणि दीर्घकालीन मालमत्ता संचय म्हणून प्राईम प्रॉपर्टीजची लोकप्रियता यामुळे येत्या महिन्यांत किंमतींच्या वाढीला चालना मिळेल. जागतिक स्तरावर, सियोल २५.२ टक्के वार्षिक वाढीसह अव्वल राहिलं, त्यानंतर १६.३ टक्के वाढीसह टोकियो आणि १५.८ टक्के वार्षिक वाढीसह दुबईचं स्थान आहे. अहवालानुसार, दुबई (१५.८ टक्के वाढ), मनीला (९.१ टक्के वाढ), बँकॉक (७.१ टक्के वाढ), माद्रिद (६.४ टक्के वाढ) आणि नैरोबी (५.६ टक्के वाढ) हे टॉप १५ यादीत समाविष्ट इतर वेगाने वाढणारे निवासी बाजार आहेत. नाईट फ्रँकचे ग्लोबल रिसर्च हेड लियाम बेली म्हणाले, “प्रमुख बाजारपेठा एकत्रितपणे दिलासा घेत आहेत. अलीकडच्या तिमाहींमध्ये आपण पाहिलेला सुधार हा कमी व्याजदराच्या अपेक्षेमुळे होता. पण आता ती वेळ पुढे ढकलली जात असल्याने किंमतींच्या वाढीचा वेग कमी होणं स्वाभाविक आहे.”

Exit mobile version