ठाणे जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक चॅम्पियनशिप २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या (टीमसीएपीवाय) खेळाडूंनी या स्पर्धेत ११ सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली. प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुले सराव करत आहेत.
१० वर्षांखालील मुली – अन्वी मोरे यांनी स्टँडिंग शॉट पुटमध्ये रौप्य पदक जिंकले.
१४ वर्षांखालील मुली – काव्या कनागळे यांनी ८० मीटरमध्ये सुवर्ण आणि लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. इरा जाधव यांनी ३०० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. काव्या कनागळे, इरा जाधव, मायरा सबनीस आणि शुभ्रा करंदीकर यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक जिंकले.
८ वर्षांखालील मुले – युवान भावसार यांनी स्टँडिंग बोर्ड जंपमध्ये सुवर्ण आणि ५० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले.
१२ वर्षांखालील मुले – अर्चित मोरे यांनी ६० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. अर्चित मोरे, अक्षित नायर, आरव कर आणि लियाम फर्नांडिस यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये कांस्य पदक जिंकले.
हे ही वाचा:
कृषि आणि शेतकऱ्यांच्या हिताला कोणताही धक्का लागणार नाही!
भारताला अमेरिकेसोबत सर्वोत्तम व्यापार करार
गोवा विशेष: विकासाला गती देणारा अर्थसंकल्प
एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान सुरक्षित
१४ वर्षांखालील मुले – स्नेह कामेरकरने ८० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. आरव विनेरकरने ३०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ८० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. स्नेह कामेरकर, आरव विनेरकर, आदित बोंद्रे आणि स्पर्श पाटील यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले.
“सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ७ खेळाडूंची निवड झाली आहे. आगामी स्पर्धेत सर्व खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे, असे म्हणत मीनल पलांडे आणि अशोक आहेर (टीएमसीपीवाय – योजना प्रमुख) यांनी सर्व खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.”







