अतुल सुभाष प्रकरण- पत्नीला नोटीस, ३ दिवसांत जबाब नोंदवण्याचे आदेश!

गैरहजर राहिल्यास होवू शकते अटक

अतुल सुभाष प्रकरण- पत्नीला नोटीस, ३ दिवसांत जबाब नोंदवण्याचे आदेश!

बेंगळुरूमधील एआय इंजिनिअरच्या आत्महत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. बेंगळूरू पोलिसांनी अतुल सुभाषच्या पत्नीला नोटीस बजावली आहे. तीन दिवसात जबाब नोंदवण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. निकिता सिंघानिया यांच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील निवासस्थानी ही नोटीस लावण्यात आली आहे. निकिता सिंघानियाची आई आणि तिच्या भावालाही त्यांचे जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.

बेंगळुरू येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाषने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. त्याने २४ पानी सूसाईड नोट मागे सोडली, ज्यामध्ये वैवाहिक समस्यांमुळे होणारा त्रास आणि पत्नीने दाखल केलेल्या अनेक केसेसची माहिती दिली.

या प्रकरणानंतर अतुल सुभाष यांचे भाऊ विकास कुमार यांच्या तक्रारीवरून निकिता आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. निकिता यांनी अद्याप या आरोपांना उत्तर दिलेले नाही.

हे ही वाचा : 

रस्‍ते कॉंक्रिटीकरणाच्‍या कामाचा दर्जा तपासा

ठाकरे आता दोन ‘शिफ्ट’मध्ये काम करणार ?

‘महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार’

हनुमान मंदिर पाडणार नाही, उद्धव ठाकरे मस्जिद वाल्यांची बाजू घेत आहात का?

दरम्यान, बेंगळूरू पोलिसांनी निकिता यांना नोटीस बजावली आहे. निकिता आणि त्यांच्या कुटुंबियांना सोमवारपर्यंत बेंगळुरू पोलिसांसमोर हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जर ते गैरहजर राहिले तर आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक केली जाऊ शकते. दरम्यान, अटक टाळण्यासाठी आरोपीं अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतात. तथापि, पोलीस चौकशीनंतर निष्कर्षांवर आधारित अटक वॉरंट जारी करू शकतात.

Exit mobile version