सुख चैन कि रोटी खाओ…वरना मेरी गोली तो है ही!

पंतप्रधान मोदींचा गुजरातच्या भूजमधून पाकिस्तानला कडक इशारा 

सुख चैन कि रोटी खाओ…वरना मेरी गोली तो है ही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रथम वडोदरा, नंतर दाहोद आणि नंतर भूज येथे पोहोचले. त्यांनी तीनही ठिकाणी रोड शो केले आणि दाहोद आणि भुज येथे जाहीर सभांना संबोधित केले. याठिकाणी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथून त्यांनी अनेक क्षेत्रांसाठी ५३,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटनही केले. भुजमधील आपल्या भाषणात त्यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला. ते म्हणाले, भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. मी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. भारतावर डोळे ठेवणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. यावेळी त्यांनी पाकिस्तानला शांततेत राहण्याचा सल्ला दिला.

पाकिस्तानला कडक इशारा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी तेथील लोकांनी पुढे यायला पाहिजे, तरुणांनी पुढे यायला हवे. आनंदी आणि शांतीचे जीवन जगा, भाकरी खा… नाहीतर खायला माझी गोळी तर आहेच.

हे ही वाचा : 

सिंदूर पुसणाऱ्यांचा नाश निश्चित!

ऑपरेशन सिंदूरनंतर अर्ध्या तासाने भारताने पाकिस्तानला कळवले…

मोदींच्या नेतृत्वात आरोग्यविषयक सुविधांचा विकास

हिंदमाताच्या तुमच्या निकृष्ट कामाची पोलखोल यापूर्वीच झालीये, मुंबईकरांना मुर्खात काढू नका!

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मी देशाच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. दहशतवाद्यांचे मुख्यालय हे लष्कराचे लक्ष्य होते. आमचे सैन्य आजूबाजूच्या परिसराचे कोणतेही नुकसान न करता परतले. यावरून आपले सैन्य किती सक्षम आणि शिस्तबद्ध आहे हे दिसून येते. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करता येतात हे आम्ही दाखवून दिले. आपल्या सैन्याच्या ताकदीमुळेच आजही पाकिस्तानचे सर्व वायुमार्ग आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज कच्छचे पर्यटन जगात प्रसिद्ध आहे. आम्ही पर्यटनालाही प्रोत्साहन देत आहोत. त्याच वेळी, पाकिस्तानसारखा देश आहे जो दहशतवादाला पर्यटन मानतो, जो जगासाठी एक मोठा धोका आहे.

Exit mobile version