अचानक पावसाच्या आगमनामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान, पावसामुळे मुंबईत साचलेल्या पाण्यावरून विरोधक प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. मुंबईच्या हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्यावरून उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. ट्वीटकरत त्यांनी आमच्या सरकारच्या काळात हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केल्याचे म्हटले होते.
मात्र, आदित्य ठाकरेंची पोलखोल झाली आहे. २०२२ मध्ये स्वतः आदित्य ठाकरेंनी हिंदमाता आणि मिलन सब वे मध्ये पाणी तुंबणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावेळी पाणी तुंबले आणि यावर भाजपाने प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या कामावर बोट ठेवले होते. यासंदर्भात भाजपाने आता २०२२ चे हे ट्वीट आज पुन्हा रिट्वीट करत आदित्य ठाकरेंचा दुटप्पीपणा समोर आणला आहे.
याबाबत भाजपाने पोस्टकरत म्हटले, हिंदमाताच्या तुमच्या निकृष्ट कामाची पोलखोल यापूर्वीच झाली आहे. मुंबईकरांना मुर्खात काढू नका. २०२२च्या पोस्टमध्ये म्हटले, माजी पर्यावरण मंत्री @AUThackeray आपण म्हणाला होता की हिंदमाता, मिलन सब वे मध्ये पाणी तुंबणार नाही मग काल झालेल्या पावसात मुंबई तुंबलीच कशी ? दरवर्षी प्रमाणे यावर्षीही @Mybmc ने मुंबई टक्केवारी करिता योग्य ती कामे केली नाहीत हे पुन्हा सिद्ध झाले.
हे ही वाचा :
गद्दार ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दिल्ली सरकारच्या शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड सादर करणार
देशात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा कहर
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबियांनी पंतप्रधान मोदींवर उधळली फुले
दरम्यान, हिंदमाता परिसरात पाणी साचलेला व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरे म्हणाले, हे पाहणे खूप वेदनादायक आहे. हा परिसर आम्ही ४ वर्षांपूर्वी पाणी साचण्यापासून मुक्त केला होता. आज, भाजपने @mybmc च्या नियंत्रणाखाली पावसाळ्यासाठी एसओपी सुरू न केल्यामुळे, तो पुन्हा एकदा पाणी साचला आहे.
हिंदमाताच्या तुमच्या निकृष्ट कामाची पोलखोल यापूर्वीच झाली आहे. मुंबईकरांना मुर्खात काढू नका. https://t.co/QQCHNDxyHj pic.twitter.com/kmfVnJYjmK
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) May 26, 2025
