पाकिस्तानवर हल्ला करताना भारताने त्यांना आधीच सावध केले होते असा आरोप विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या एका विधानाचा आधार घेण्यात आला होता. पण त्यात कोणतेही तथ्य नव्हते, असे स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतरही याच दाव्यावर विरोधी पक्ष कायम होते. आता जयशंकर यांनी संसदीय सल्लागार समितीसमोर
विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी संसदीय सल्लागार समितीला माहिती दिली की भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर ३० मिनिटांत पाकिस्तानला सतर्क केले होते. या कारवाईत पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. ही कारवाई ७ मेच्या रात्री पार पडली.
“ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात पाकिस्तानला कळवण्यात आले की, फक्त दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य केले जात आहेत. भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाची अंमलबजावणी ही दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांमधील थेट संवादानंतर झाली, जो इस्लामाबादच्या वतीने सुरू झाला,” असे जयशंकर यांनी सांगितल्याचे सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले.
विदेश मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद एस. जयशंकर यांनी भूषवले. यामध्ये ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमापार दहशतवादावर चर्चा झाली. या बैठकीला के. सी. वेणुगोपाल, मनीष तिवारी, मुकुल वासनिक, प्रियांका चतुर्वेदी, अपराजिता सारंगी आणि गुरजीत सिंग औजला यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.
“ते फायर करतील, आपण फायर करू” – जयशंकर
या बैठकीदरम्यान, जयशंकर यांनी स्पष्ट केले की भारताने अत्यंत अचूकपणे फक्त दहशतवादी तळांवर कारवाई केली, आणि त्वरित पाकिस्तानला माहिती दिली, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात राहील. अमेरिकेच्या भूमिकेवर बोलताना जयशंकर म्हणाले, “ते फायर करतील, आपण फायर करू. ते थांबतील, आपणही थांबू,” हे भारताचे स्पष्ट धोरण अमेरिकेला सांगण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव यांनी पाकिस्तानकडून प्रत्युत्तर येण्याची शक्यता असल्याचे सांगितले, तेव्हा भारताने ठाम उत्तर दिले: “जर पाकिस्तानने प्रकरण वाढवले, तर आम्हीही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत.”
राहुल गांधी यांचा आरोप आणि त्यावर स्पष्टीकरण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की “ऑपरेशन सिंदूर”च्या सुरुवातीसच सरकारने पाकिस्तानला माहिती दिली, हे एक ‘गुन्हा’ होता. “हल्ला सुरू करतानाच पाकिस्तानला माहिती देणे हे गुन्हा आहे. जयशंकर यांनी स्वतः कबूल केले आहे. हे कोणाच्या परवानगीने केले गेले? आपल्या हवाई दलाचे किती विमानं त्यामुळे गमावली गेली?” असा सवाल राहुल गांधी यांनी X (ट्विटर) वर पोस्ट केला होता.
हे ही वाचा:
नवव्या जागतिक ड्रोन परिषदेत बघा काय घडलं!
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवरील परिस्थिती काय ?
देशात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा कहर
यावर, परराष्ट्र मंत्रालयाने राहुल गांधींचा आरोप फेटाळला आणि तो “पूर्णपणे तथ्यांची चुकीची मांडणी” असल्याचे सांगितले.
“जयशंकर यांनी सांगितले की ऑपरेशन सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला माहिती देण्यात आली. पण राहुल गांधी हे खोटेपणाने ‘सुरुवतीपूर्वी’ माहिती दिल्याचे भासवत आहेत, जी गोष्ट चुकीची आहे,” असे मंत्रालयाने म्हटले.
भारत-पाक संघर्षाची पार्श्वभूमी
भारताने ७ मे रोजी सकाळी ऑपरेशन सिंधूर अंतर्गत ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. हे हल्ले २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात होते, ज्यामध्ये २६ पर्यटक मारले गेले होते. यानंतर ८, ९ व १० मे रोजी पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर प्रतिहल्ल्याचे प्रयत्न झाले, मात्र भारतीय लष्कराने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानी लष्करी स्थळांवर जोरदार कारवाई केली.
