‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवरील परिस्थिती आता जवळपास सामान्य असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे (BSF) महानिरीक्षक एम. एल. गर्ग यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, “सध्या सीझफायर आहे, परंतु आम्ही नेहमीच सज्ज आहोत. कोणत्याही वेळी आणि कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला तडाखेबंद उत्तर देण्याची आमची पूर्ण क्षमता आहे. आयजी गर्ग यांनी सांगितले, की अलीकडे झालेल्या संघर्षात ड्रोन हे मोठ्या धोक्याचे शस्त्र म्हणून पुढे आले, मात्र आपल्या संरक्षण व्यवस्थेने सिद्ध केले की ती जगातील सर्वोत्तम आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पश्चिमी सीमेवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जैसलमेर, पोखरण, बीकानेर येथे हल्ल्यासाठी आलेले सर्व ड्रोन भारतीय फौजांनी पाडले.
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानकडून सातत्याने सायबर हल्ले केले गेले, परंतु भारतीय सायबर तज्ज्ञांनी ते सर्व निष्फळ ठरवले. तसेच सोशल मीडियावर अफवांचे साम्राज्य पसरवण्याचा खूप प्रयत्न झाला, पण त्यालाही योग्य उत्तर देण्यात आले. माध्यमांनी सत्य प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सीमेवरील परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “सध्या सीमेवर तापमान ४०-४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तरीही आपले जवान पूर्ण सज्ज अवस्थेत आहेत आणि कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सदैव तयार आहेत. आमची फौज देशाच्या सुरक्षेबाबत कधीच तडजोड करणार नाही.
हेही वाचा..
गद्दार ज्योती मल्होत्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दिल्ली सरकारच्या शंभर दिवसांचे रिपोर्ट कार्ड सादर करणार
देशात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा कहर
पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली सीआरपीएफ जवानाला अटक!
उल्लेखनीय आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले होते. या कारवाईत पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिम आणि एअरबेसना मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले सुरू केले होते. त्यामुळे त्या भागात परिस्थिती तणावपूर्ण झाली होती.
