पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. मोती राम जाटला असे अटक केलेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. सोमवारी (२६ मे) एनआयएने ट्वीटकरत या कारवाईची माहिती दिली. दरम्यान, जवानाला अटक झाल्यानंतर लगेचच केंद्रीय राखीव पोलिस दलाने त्याला बडतर्फ केले आहे.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, जवान मोती राम हा २०२३ पासून हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी होता. तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना (पीआयओ) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होता. माहितीच्या बदल्यात त्याला विविध माध्यमातून निधी मिळाल्याचेही एनआयएला आढळून आले. त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
पटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. ७ मे रोजी सुरू झालेल्या भारताच्या प्रमुख दहशतवादविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ ज्ञात दहशतवादी पायाभूत सुविधा स्थळे उद्ध्वस्त केली. तेव्हापासून, तपास संस्थांनी हेरगिरीच्या आरोपाखाली अनेक व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. जवान मोती राम याचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सीआरपीएफने त्याला सेवेतून काढून टाकले आहे.
हे ही वाचा :
पटणामध्ये आढळले दोन कोरोना रुग्ण
आरोपी कादिरच्या अटकेदरम्यान जमावाचा पोलिसांवर हल्ला, कॉन्स्टेबलचा मृत्यू!
पीसीओएसचा महिलांच्या मेंदूवरही होतो परिणाम
दरम्यान, पाकिस्तानसाठी हेरगिरीकरणाऱ्या अनेकांना भारताच्या संरक्षण पथकाने अटक केली आहे. त्यांचा चौकशी केली जात आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास पथकाकडून करण्यात येत आहेत.
The National Investigation Agency (NIA) has arrested a CRPF personnel for sharing sensitive information with Pak-Intelligence officers. The accused, Moti Ram Jat, was actively involved in espionage activity and had been sharing classified information related to national security… pic.twitter.com/99PR7hAGm9
— ANI (@ANI) May 26, 2025
