छत्तीसगड: २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!

३७.५ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर

छत्तीसगड: २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. हे नक्षलवादी अबुझहमाड परिसरात सक्रिय होते आणि त्यांच्यावर एकूण ३७.५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शुक्रवारी (११ जुलै) एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कुतुल, नेलनार आणि इंद्रावती क्षेत्र समित्यांमधील नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इंडो-तिबेटी सीमा पोलिस (आयटीबीपी) यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये १४ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी विभागीय समिती सदस्य मनकु कुंजम (३३) याच्या डोक्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस होते, तर क्षेत्र समिती सदस्य हिदमे कुंजम (२८), पन्ना लाल उर्फ बोटी (२६) आणि सानिराम कोरम (२५) यांच्या डोक्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. तर अकरा नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस होते, तर इतर सात जणांवर ५०,००० रुपयांचे बक्षीस होते, असे त्यांनी सांगितले.

नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणावर मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी प्रतिक्रिया दिली आहे . त्यांनी सोशल मीडिया ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, “लोकांना आता बंदुकी नव्हे तर विकासाच्या मार्गावर एकत्र चालायचे आहेत.” आमच्या सरकारमध्ये आतापर्यंत एकूण १४७६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शुक्रवारी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना प्रोत्साहनासाठी प्रत्येकी ५० हजारांचे धनादेश दिले जातील.
हे ही वाचा : 
दिल्ली हादरली: इमारत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली, मदतीचे प्रयत्न सुरू
टेनिस खेळाडू राधिका यादवच्या अकादमीच्या वादातून वडिलांनी केला खून
दिल्ली-एनसीआरमध्ये दोन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के!
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!

सीएम साई म्हणाले की, हे आमच्या सरकारच्या नवीन आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण २०२५ आणि सार्वजनिक कल्याणकारी योजनांच्या सकारात्मकतेचा पुरावा आहे. ‘नियाद नेल्लनार’ सारख्या योजनांनी आत्मविश्वास निर्माण केला आहे. लोक हिंसाचार सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात परतत आहेत. या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही पूर्णपणे दृढ आहोत. डबल इंजिन सरकार ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Exit mobile version