छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, बीएसएफचे दोन जवान जखमी!

नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिली माहिती 

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट, बीएसएफचे दोन जवान जखमी!

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी (IED) स्फोटात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. आज (१७ जानेवारी) सकाळी गरपा गावाजवळ बीएसएफचे पथक गस्त घालत असताना हा स्फोट झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले की, बीएसएफचे पथक गरपा गावाच्या मध्यभागी होते तेव्हा नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात २ जवान जखमी झाले.  जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याआधी गुरुवारी विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते. जखमींना विजापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृदुल बर्मन आणि मोहम्मद इशाक अशी जखमी जवानांची नावे आहेत.

हे ही वाचा : 

पकडला… सैफ हल्लाप्रकरणी एक संशयित ताब्यात

खराब कामगिरीनंतर बीसीसीआयची खेळाडूंवर १० नियमांची वेसण

तैवानच्या हद्दीत दिसली १३ चीनी विमाने, सात चीन नौदलाची जहाजे!

न्याय मागण्याचा हा कसला बीड पॅटर्न ?

दरम्यान, छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागात गुरुवारी (१६ जानेवारी) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये  झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले होते. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे.

Exit mobile version