…आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून चिदंबरम पडले तोंडघशी!

…आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून चिदंबरम पडले तोंडघशी!

आम्हाला थेट लसींची खरेदी करण्याची परवानगी द्या, असे कोणत्या राज्यांनी विचारले होते, असा सवाल उपस्थित करणारे काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम तोंडघशी पडले आहेत. सोशल मीडियावर कोणत्या कोणत्या राज्यांनी आणि नेत्यांनी राज्यांना लसी खरेदी करण्याचे सर्वाधिकार द्या, ही मागणी करणारे ट्विट शेअर केल्यावर चिदंबरम यांना उपरती झाली आणि त्यांनी आपली चूक कबूल केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अशी मागणी केल्याचे ट्विट त्यांच्या कुणीतरी लक्षात आणून दिल्यावर चिदंबरम यांना माफी मागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांच्या त्या ट्विटवर अनेकांनी मग काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही ट्विट टाकले, ज्यात स्वतः राहुल गांधी यांनीच राज्यांना लस खरेदीचे आणि वितरणाचे अधिकार द्या, अशी मागणी केली होती.

हे ही वाचा:

केमिकल कंपनीत काल आग, तर आज गोडाऊनने पेट घेतला

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

ताहिलरामाणी लवकरच घेणार ‘त्या’ पत्रांची दखल

पश्चिम बंगाल: वीज कोसळून २७ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी लसीकरणाच्या नव्या धोरणाबाबत घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांना लसीकरणाच्या गोंधळावर निर्णय घ्यावाच लागला अशा कोलांटउड्या अनेक राज्याचे नेते मारू लागले. पंतप्रधानांनी या भाषणात म्हटले होते की, लसीकरणाचे मोहीम १६ जानेवारीला सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात काही राज्यांनी आम्हाला लसीकरणाच्या खरेदीचे, वितरणाचे अधिकार हवेत अशी मागणी करायला सुरुवात केली. केंद्राच्याच हातात कशाला सगळी ही जबाबदारी? तेव्हा मग राज्यांकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली. पण पुढे राज्यांना ते आव्हान पेलता आले नाही, त्यामुळे पुन्हा एकदा केंद्राने ते काम आपल्या खांद्यावर घेतले आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यांना हे अधिकार देण्याची मागणी करणारे पत्र ट्विटरवर शेअर झाले आहे. त्यांनीही राज्यांना लसीकरणाचे अधिकार हवेत अशी मागणी केली होती. पण लसी विकत घेण्यात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला अपयश आले. परिणामी, लसीकरणात गोंधळ उडाला. चिदंबरम यांच्या या माफीनाम्यामुळे लसीकरणासाठी आधी आग्रह धरणाऱ्या आणि नंतर आव्हान सहन न झालेल्या राज्यांची एकप्रकारे पोलखोल झाली आहे.

Exit mobile version