“दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर व्यक्त केल्या भावना

“दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला…”

“विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेले, राज्यातील प्रश्नांची जाण असलेले ते नेते होते. त्यांच्याबद्दल जनसमान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अत्यंत कठीण दिवस आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला आहे, अशा वैयक्तिक भावना देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

“पवार कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे. आम्ही लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“मोठा भाऊ गेला… अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान”

राज्याच्या राजकारणातील ‘दादा’ व्यक्तिमत्त्व हरपले! कशी होती राजकीय कारकीर्द?

“जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते अजित पवार”

चांदीला चढा भाव! २१,००० रुपयांची उसळी

महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

अजित पवार यांच्या निधनानंतर आज राज्यात शासकीय सुट्टी घोषीत केली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Exit mobile version