उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही का?

चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही का?

ईद निमित्त भाजपाने हाती घेतलेल्या ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमावरून उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रत्युत्तरानंतर महिला आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्त्व आठवलं नाही?, असा सवाल उपस्थित करत जगाला प्रेरणा देणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींबद्दल बोलण्याची तुमची कुवत नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, उद्धवजी, तुम्ही त्या तुष्टीकरणाच्या राजकारणात इतके बरबटले आहात की तुम्हाला सावरकरांचाही विसर पडला. काय म्हणाले होते सावरकर, हिंदू म्हणजे कोण? तर हिंदू म्हणजे, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू.

त्यामुळेच आम्ही दिवाळीला जसा आनंदाचा शिधा देतो तसंच पंतप्रधानांनी सौगात-ए -मोदी दिलं तर ठाकरे घाबरले वाटतं? मी कायम म्हणते की आम्हाला हिंदुंत्वाचा सार्थ अभिमान आहे. हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे देखील म्हणाले होते की, गर्व से कहो हम हिंदू है. त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत पण तुमंच काय…?, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्त्व आठवलं नाही? वक्फ बोर्डाच्या सुधारित बिला विरूध्द तुमचे नेते मतदान करतात तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्त्व? या देशाच्या १४० कोटी जनतेला आपलं कुटुंब मानणाऱ्या. वसुधैव कुटुंबकम् म्हणत जगणाऱ्या आणि साऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींबद्दल बोलण्याची तुमची कुवत नाही.

तुम्ही आजही जातीवाद करण्यात मश्गुल आहात. देशाभिमान आणि राष्ट्राचं सन्मान याच्याशी तुमचं घेणंदेणं नाही आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं देखील तुम्हाला सोयंर राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी करा, त्यामध्ये औरंग्याचे गुणगाण गाणाऱ्यांवर टाळ्या वाजवा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

हे ही वाचा : 

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निकोलस पूरन आघाडीवर

अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल!

कर्नाटक: औरंगजेब आणि टिपू सुलतानचा फोटो शेअर करत काँग्रेस नेत्याची वादग्रस्त पोस्ट!

गाझामध्ये इस्रायली हल्ला, हमास प्रवक्त्यासह सात जण ठार!

दरम्यान, भाजपाच्या ‘सौगात ए मोदी’ उपक्रमावरून उद्धव ठाकरे म्हणाले, हे ‘सौगात-ए-मोदी’ नाहीतर ‘सौगात-ए-सत्ता’ आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, याचे एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले. ही ‘सोगात-ए-सत्ता’ ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे, हे आधी भाजपने जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Exit mobile version