अहिल्यानगर आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडणार

अहिल्यानगर आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडणार

मुकुंदनगर, फकीर वाडा परिसरामध्ये मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या असून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद नगर फकीरवाडा परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते.

मात्र या निवेदनाची अद्यापही दखल घेतली गेली नसून गुरुवारी १७ जुलैला मनपा आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडणार असून सदर आंदोलन चिघळल्याने महानगरपालिकेचे कर्मचारी व कुत्र्याचे ठेकेदार हे मिळून आंदोलकांवर किंवा कुत्र्यांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या आंदोलनास पोलीस संरक्षण देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय व तोफखाना पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, मुकुंद नगर परिसरात विविध ठिकाणी मोकाट कुत्रे धुमाकूळ घालत असून सकाळच्या वेळी लहान मुले शाळेत जाताना त्यांच्या वर भुंकून हल्ला करतात तसेच महिला व वृद्धांना सुद्धा या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

मुकुंद नगर परिसरात विविध ठिकाणी नेहमीच कोणाला ना कोणाला तरी कुत्रा चावण्याची घटना घडत आहे.तरी मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन मोकाट व पिसाळलेले कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या गुरुवारी १७ जुलैला महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या दालनात कुत्रे सोडू आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यानी निवेदनाद्वारे दिलेला होता.

त्यामुळे गुरुवारी १७ जुलैला होणाऱ्या आंदोलनात महानगरपालिकेचे कर्मचारी व ठेकेदार हे मिळून आंदोलकांवर किंवा कुत्र्यांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.यात मुक्या जनावरांना इजा होण्याची शक्यता आहे.तरी आंदोलनाला पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे.

Exit mobile version