…आणि योगी आदित्यनाथ यांनी छोट्या अनबी अलीचे ऍडमिशन केले!

मुलीने बिनधास्त योगींशी साधला संवाद

…आणि योगी आदित्यनाथ यांनी छोट्या अनबी अलीचे ऍडमिशन केले!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लखनऊ येथे आयोजित ‘जनता दर्शन’ कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दर्शनदरम्यान मुख्यमंत्र्यांनी एका चिमुकल्या मुलीसोबत मनमोकळा संवाद साधला. या संवादानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या मुलीला शाळेत प्रवेश मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश दिले.

अनबी अली ही मुलगी तिची आई फराह मुशर्रफ यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे आली होती. तिने लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी मदत मागितली होती. एएनआयशी बोलताना अनबी अली म्हणाली, “मी मुख्यमंत्री योगीजींना भेटले आणि मला लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्याची विनंती केली.”

अनबी अलीची आई फराह मुशर्रफ यांनीही या भेटीनंतर आशा आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आम्ही माझ्या मुलीच्या लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधील प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो. तिने मुख्यमंत्र्यांसमोर एक कविता सादर केली. तिला शाळेत जायची खूप इच्छा आहे. आम्हाला खात्री देण्यात आली आहे की तिला शाळेत प्रवेश मिळेल.” मग मुख्यमंत्री योगी यांनी त्या मुलीला चॉकलेट दिले आणि आपल्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांना त्या मुलीचे ऍडमिशन व्हायला पाहिजे असे सांगितले.

हे ही वाचा:

मुंबईत ३६ तासांत १२ मुले गायब, त्यात ८ मुली

गणेश खणकरांची भाजप गटनेतेपदी वर्णी

गाझा- इजिप्तमधील रफाह क्रॉसिंग अंशतः उघडले

१४६ प्रकाशवर्षे अंतरावर सापडला राहण्यायोग्य ग्रह!

या संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सादर केलेल्या लेखी अर्जांचा आढावा घेतला आणि त्यांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या मुलांशीही त्यांनी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना प्रोत्साहन दिले. जनता दर्शन कार्यक्रम हा उत्तर प्रदेश सरकारचा एक उपक्रम असून, यामार्फत राज्यभरातील नागरिक थेट मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्या तक्रारी आणि मागण्या मांडू शकतात.

Exit mobile version