एक डॉक्टर खुनशी, दहशतवादी कसा असू शकतो? हे आहे त्याचे उत्तर

राजकीय नेत्यांनी "इस्लाम आणि राष्ट्रवाद" यासंबंधी तज्ञांचे विचार नजरेखालून घालावे.

एक डॉक्टर खुनशी, दहशतवादी कसा असू शकतो? हे आहे त्याचे उत्तर

श्रीकांत पटवर्धन 

दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या संदर्भात पकडले गेलेले सर्व आरोपी मुस्लीम आहेत. त्यातील बरेच डॉक्टर, उच्च शिक्षित ही आहेत. बऱ्याच जणांना डॉक्टर दहशतवादी , खुनशी कसा असू शकतो ? असे प्रश्न पडून एकूणच हे सर्व कसे झाले ? – असा संभ्रम उत्पन्न झाला आहे.

या संबंधी विचार करताना हे लक्षात येते, की स्वातंत्र्यानंतर, (धार्मिक आधारावर फाळणी झाल्यानंतर)  उर्वरित भारताने Secularism / निधर्मितेचा स्वीकार करून, इथे मुस्लीमानाही राहू देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये, इस्लाम चे मूळ स्वरूपच लक्षात घेण्यात आलेले नाही. मुस्लिमांमधील उच्च शिक्षित असे देशविरोधी कसे वागू शकतात ? – या प्रश्नामागे इस्लाम  विषयीचे गाढ अज्ञान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाळणी नंतर हिंदू मुस्लीम लोकसंख्येची संपूर्ण अदलाबदल व्हावी असे म्हणणे मांडत. जोपर्यंत शेवटचा मुस्लीम इथून पाकिस्तानात निघून जात नाही, तोपर्यंत फाळणी ची प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामागे त्यांचा इस्लामचा सखोल अभ्यास होता, हे लक्षात येते.

वस्तुस्थिती ही आहे, की हे जे काही झाले आहे, त्यामागे इस्लामची स्वच्छ, स्पष्ट शिकवण हेच खरे कारण आहे. यासाठी आपण आता एकूणच  “राष्ट्रवाद” या विषयासंबंधी ‘इस्लाम’ चे म्हणणे काय आहे, ते बघूया.

डॉक्टर अली मोहम्मद नक्वी हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठात प्रोफेसर असून, इस्लाम विषयक अभ्यास, संशोधन ह्यांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ आहेत. त्यांची सुमारे अठ्ठावीस प्रकाशित पुस्तके पर्शियन, इंग्रजी. अरेबिक व इतर भाषांतील असून, त्यातील अनेकांचे इतर परदेशी भाषांतूनही  भाषांतर झालेले आहे. त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे उप कुलगुरूपद भूषवले असून, अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिसंवाद, यांत भाग घेऊन संशोधन निबंध सादर केलेले आहेत. या लेखातील मांडणी ही मुख्यतः त्यांच्या  “इस्लाम आणि राष्ट्रवाद ” या पुस्तकावर आधारित आहे, याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.

या ग्रंथातील भाग सात – “इस्लाम आणि राष्ट्रवाद” – याच्या शीर्षकांतच ते म्हणतात -“इस्लाम आणि राष्ट्रवाद हे दोन विरुद्ध ध्रुव (Opposite Poles) आहेत ” !

“राष्ट्रवाद, ही एक सामाजिक राजकीय विचार प्रणाली, आणि जीवनपद्धती आहे, जी व्यक्तीचे  व्यक्तिगत व सामाजिक जीवन पूर्णतः प्रभावित करते. “इस्लाम” ही सुद्धा एक अशीच स्वतंत्र, सर्वंकष, आध्यात्मिक, व्यावहारिक, राजकीय, आणि सामाजिक विचारप्रणाली आहे, जिच्यांत काही विशिष्ट  श्रद्धा समाविष्ट आहेत. त्यामुळे तिचा   “राष्ट्रवादा “शी संघर्ष / विरोध येणे अगदी अटळ आहे. मुस्लीम व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाशी संबंधित कोणत्याही गोष्टी बाबत इस्लामिक आदर्शवाद हा इतर कुठल्याही विचारधारेशी पूर्ण विसंगत / विरोधी  आहे. थोडक्यात सांगायचे, तर एक मुस्लीम व्यक्ती, ही एकाच वेळी ‘अनेकेश्वर वादी मुस्लीम’  किंवा ‘साम्यवादी मुस्लीम’ असूच शकत नाही. इस्लाममध्ये राष्ट्रवादाला जराही थारा नाही, तिथे स्वत्वाचा प्रश्न येतो, आणि दोन्ही पूर्णतः परस्पर विरोधी आहेत.

(In Islam, there is no room for one to be a loyal and genuine nationalist. It is a question of identity, and one negates the other. )

इस्लामिक एकतेचा पाया, हा केवळ समान श्रद्धा आणि  सद्गुण हाच असून तिथे वंश, देश, भाषा किंवा संस्कृती यांना स्थान नाही. राष्ट्रवादाचे ध्येय राष्ट्रनिर्मिती हे असते, तर इस्लामचे ध्येय वैश्विक एकात्मता हे असते. राष्ट्रवादात पितृभूमिशी आपुलकी, निष्ठा महत्वाची असते, तर इस्लाममध्ये देव (अल्लाह) आणि धर्माशी एकनिष्ठ असणे महत्वाचे असते. राष्ट्रवादात भौगोलिक सीमांना आणि वंशभेदांना महत्व असते, तर इस्लाम त्यांना नाकारतो. राष्ट्र्वादात ऐतिहासिक परंपरा, संस्कृती, चालीरीती, आणि राष्ट्रातील ऐतिहासिक महापुरुष महत्वाचे असतात, तर इस्लामची दृष्टी – भौगोलिक सीमा, वंश, देश, या सर्वांच्या पलीकडे जाते. इस्लाम सांगतो, की मोजेस, जीझस, मोहम्मद, आणि अली हे संपूर्ण  मानव जातीचे आहेत. जगातील सर्व देशांनी “कुराण” हा त्यांचा ग्रंथ मानावा, “काबा”ला पवित्र मानावे, आणि इस्लामच्या नेत्यांना त्यांचे नेते मानावे, अशी इस्लामची अपेक्षा आहे.

इस्लाम सांगतो, की जगातले सर्व मुस्लीम हे एक आहेत आणि सर्व मुस्लीम राष्ट्रे – मग ती अरब, गैर – अरब, तुर्क, अफगाण, भारतीय, कृष्णवर्णी, श्वेतवर्णी, पीतवर्णी, कोणीही असोत, एकाच समान श्रद्धेच्या पायावर एकच समाज (उम्मा) असावेत / आहेत. अर्थात राष्ट्रवाद्यांना – धर्माच्या पायावर आधारित असे हे अनेक राष्ट्रांचे “ऐक्य” – हा राष्ट्रवादासाठी, राष्ट्राच्या अस्मितेसाठी  धोका वाटतो.

हे ही वाचा:

दिल्ली स्फोटकांचे धागेदोरे मिनी पाकिस्तान बनलेल्या ‘नूंह’मध्ये

महिला मतदानाच्या ७१% फॉर्म्युल्याने एनडीएला हात

१५ नोव्हेंबरचा सुवर्ण दिवस!

जनतेने ‘सुशासना’वर केले शिक्कामोर्तब

अशातऱ्हेने राष्ट्रवाद आणि इस्लाम यांचे सामाजिक व राजकीय दृष्टीकोन पूर्णतः वेगळे असल्याने, ते एकत्र नांदू शकत नाहीत. अनेकेश्वरवाद किंवा निरीश्वरवाद यांच्या खालोखाल इस्लामला असलेला मोठा धोका कुठला असेल, तर तो देश, वंश, वर्ण, संस्कृती यांवर आधारित राष्ट्रवाद हाच होय. राष्ट्रवाद आणि इस्लाम यांच्यात असलेले हे वैर नवीन नाही. ते इस्लामच्या अगदी सुरवातीच्या काळापासूनच आहे.

आपण मुस्लीम तेव्हाच असतो, जेव्हा जीवनाच्या सर्व अंगांचा विचार आपण इस्लामिक दृष्टीने करतो. जर आपण सामाजिक व राजकीय बाबतीत वेगळा (गैर इस्लामिक) दृष्टीकोन स्वीकारला, अर्थात  आपण इस्लामचा काही भाग नाकारला, तर आपण स्वतःला मुस्लीम कसे म्हणवू शकतो ?

कोणतीही इस्लामेतर विचारधारा अंगीकारून  कोणी स्वतःला मुस्लीम म्हणवू शकत नाही. “राष्ट्रवादी मुस्लीम” ही संकल्पना तितकीच विचित्र, असंभवनीय आहे, जितकी – “भांडवलवादी मार्क्सिष्ट” , किंवा “धार्मिक साम्यवादी / कम्युनिष्ट ” ! ह्या संकल्पना परस्परविरोधी आहेत. जेव्हा इस्लामी आदर्शवाद बळावतो, तेव्हा राष्ट्रवाद मृतप्राय होतो, आणि जेव्हा राष्ट्रवाद बळावतो, तेव्हा इस्लाम नष्टप्राय  होतो. एकाचवेळी दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नावांत पाय ठेवणे कुणालाच शक्य नाही. जर कोणी तसा दावा करीत असेल, तर ते एक तर अज्ञान असेल, किंवा ढोंग. थोर इस्लामी अभ्यासक इक्बाल यांनी भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय नेते  मौलाना हुसेन अहमद यांना उद्देशून रचलेल्या एका काव्यात असे म्हटले आहे,  की जे देश आणि राष्ट्र यांना एकतेचा पाया मानतात, त्यांना प्रेषिताने (मोहम्मदाने)  दिलेली ‘इस्लामची खरी शिकवण’ समजलेलीच नाही !

त्यामुळे, आपण राष्ट्रवादाचा, आणि इतरही गैर इस्लामिक विचारधारांचा पूर्णपणे त्याग करून इस्लामकडे वळणे जरुरीचे आहे. जर कोणी तसे न करता दोहोंची सरमिसळ करेल, तर वस्तुतः त्याने इस्लामशी फारकत घेतली, व तो इस्लामविरोधी बनला, असाच त्याचा अर्थ होईल. इस्लाम हे एक असे सर्वव्यापी तत्त्व आहे, की जे तुम्ही एक तर पूर्णतः स्वीकारता, किंवा पूर्णतः नाकारता. थोडेसे हे आणि थोडेसे ते, असला अर्धवटपणा ह्यांत चालत नाही.”

पुढे राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर कुराणाच्या आधारे भाष्य करताना ते म्हणतात – “राष्ट्रवाद हा अखिल मानवजातीचा विचार कधीच करीत नाही. उलट इस्लाम हा अखिल मानवजाती कडे एकात्म दृष्टीने बघतो. इस्लामचे अंतिम उद्दिष्ट हे एकेश्वरवादी वैश्विक समाज निर्मितीचे आहे. एक असा समाज, जो भौगोलिक, वांशिक, भाषिक, व सांस्कृतिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन समान श्रद्धांच्या पायावर एकात्म असेल.

मानवजातीची राजकीय, राष्ट्रीय आधारावर विभागणी करणे हा कुराणाच्या दृष्टीने भयंकर गुन्हा असून त्याचा परिणाम म्हणून माणसाला दैन्य आणि दैवी प्रकोप भोगावे लागतात. कुराणामध्ये एकही ओळ अशी नाही, जी राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेला, किंवा देश आणि वंश यांच्या आधारे मनुष्यजातीच्या विभागणीला, दुजोरा देईल.  प्रेषिताने नेहमीच अखिल मानवजातीच्या एकात्म समाज (उम्मा) निर्मितीचे लक्ष्य ठेवले. प्रादेशिक किंवा वांशिक अस्मितांना, श्रेष्ठत्वाच्या कल्पनांना गौण ठरवले. कुराणाच्या आदेशानुसार इस्लामचे कार्य राष्ट्रीय  नसून, वैश्विक पातळीवरचे आहे, जगभरातल्या श्रद्धाळू लोकांनी एकाच ध्वजाखाली एकत्र येणे इस्लामला अभिप्रेत आहे. कुराणाची शिकवण वैश्विक असून सर्व मानवजातीसाठी आहे, असे मानले जाते.

अशा तऱ्हेने इस्लामची ध्येये, जीवनदृष्टी, आणि शिकवण ही सर्व राष्ट्रवादाच्या सर्वस्वी विरोधी आहेत. राष्ट्रवादाच्या दृष्टीने निष्ठा ही प्रथम (स्वतःच्या) देशाशी हवी, तर इस्लामच्या दृष्टीने ती केवळ अल्लाहशीच हवी.

आत्यंतिक देशप्रेम हा राष्ट्रवादाचा पाया, तर इस्लाममध्ये अल्लाह विषयी अतूट श्रद्धा आणि  इमान हाच पाया. राष्ट्र्वादात प्रेम आणि निष्ठा ही सर्वस्वी देशाच्या पायी वाहिलेली असते, आणि वेळप्रसंगी देवावरील निष्ठेला दुय्यम स्थान मिळते. हे कुराणाला कधीही मान्य होणारे नाही,  कारण ते पाखंड, पाप आहे. देशाला, राष्ट्राला देवाहून अधिक महत्व देणे, हे इस्लामला मंजूर नाही.

राष्ट्र्वादात देशाच्या भौगोलिक सीमांशी बांधिलकी, निष्ठा अभिप्रेत आहे, तर इस्लाममध्ये निष्ठा ज्याने भूमी निर्माण केली, त्या अल्लाहवर आहे. इस्लामनुसार संपूर्ण जगावर मालकी केवळ अल्लाहचीच आहे, आणि जे त्याच्यावर श्रद्धा, निष्ठा ठेवतात, त्यांचा अल्लाहच्या भूप्रदेशावर, त्याच्या नियंत्रणावर अधिक हक्क आहे. कुराणात यावर भर दिलेला आहे, आणि हे सांगणाऱ्या कित्येक ओळी आहेत, की कुठल्याही देशाचा कोणत्याही विशिष्ट भूप्रदेशावर हक्क नसून, सगळी भूमी केवळ अल्लाहचीच आहे. इस्लामच्या ह्या व्यापक दृष्टिकोनामुळे सच्च्या मुस्लिमाची बांधिलकी कोणत्याही भौगोलिक सीमांशी, राष्ट्राशी राहात नाही, तो संपूर्ण जग अल्लाह आणि त्याच्या एकनिष्ठ सेवकांचेच असल्याचे मानतो.  प्रसिद्ध इस्लामिक विचारवंत इक्बाल म्हणतो, “सगळी भूमी ही अल्लाहचीच; त्यामुळे ती आमचीच ” कुराण नेहमी अखिल जगताचाच विचार करते, कुणा एका राष्ट्राचा नव्हे. त्यामुळे ‘जन्मस्थानावरून नागरिकत्व ठरते’, ही कल्पनाच इस्लामला मान्य  नाही, त्याऐवजी ते श्रद्धेवरून ठरते, असे इस्लाम मानतो. आणि इथे राष्ट्रवादाचा पायाच उखडला जातो.

 

इथपर्यंतचे सर्व विवेचन  डॉक्टर अली मोहम्मद नक्वी यांच्या ग्रंथाच्या आधारे झाले. आता दुसरे एक इस्लामी विचारवंत सय्यद क़ुत्ब यांचा खालील उतारा पाहू –  “जिथे अल्लाहच्या शरियतचा पूर्ण अंमल चालतो, आणि जिथे अल्लाहशी असलेल्या संबंधांच्या पायावरच सर्व मानवी संबंध आधारलेले असतात, असा जेव्हढा जगाचा भाग, तेव्हढा सोडून इतरत्र कोणताही भाग हा कुणा मुस्लीमाचा देश असूच शकत नाही. मुस्लिमाची अल्लाह वरील श्रद्धा, हीच त्याची राष्ट्रीयता, जी त्याला एकात्म मुस्लीम समाजाचा – ‘दार उल इस्लाम’चा घटक बनवते. एकमेव अल्लाहवर ज्यांचा अतूट विश्वास नाही, असा कोणीही मुस्लीमाचा नातेसंबंधी असू शकत नाही. आणि अशा तऱ्हेने, अल्लाहवरील समान विश्वासाच्या माध्यमातून त्याचे (मुस्लिमाचे) इतर श्रद्धाळूंशी संबंध जुळतात.  मुस्लिमाचे आपल्या आई, वडील, भाऊ, पती – पत्नी किंवा इतर नातेसंबंधी यांच्याशी संबंध, हे केवळ त्यांच्या अल्लाहशी असलेल्या संबंधांतूनच उद्भवतात. म्हणजे, अल्लाहशी संबंध प्रथम, नातेसंबंध मागाहून. ”

“एखाद्या मुस्लिमाचे राष्ट्रीयत्व, ज्याने तो ओळखला जातो, ते एखाद्या देशाच्या शासनाने ठरवलेले नसते; ज्या कुटुंबात तो राहतो, जिथे त्याला सुखशांती मिळते, ते कुटुंब रक्ताच्या नात्यांनी बांधलेले नसते; तो ध्वज, ज्याच्या सन्मानासाठी मुस्लीम हौतात्म्य पत्करतो, तो कुणा राष्ट्राचा ध्वज नसतो; आणि ज्या विजयाचा उत्सव मुस्लीम साजरा करतो, तो कुणा देशाच्या लष्कराचा विजय नसतो. तर इथे ‘राष्ट्रीयता’ ही केवळ धर्मश्रद्धा च असू शकते. पितृभूमी ही ‘दार उल इस्लाम’ असते. शासक / राज्यकर्ता हा केवळ अल्लाह असू शकतो. आणि ‘राज्यघटने’ची जागा  केवळ ‘कुराण’ च घेऊ  शकते. पितृभूमी, राष्ट्रीयत्व, आणि नातेसंबंध यांच्या विषयी ह्या संकल्पना प्रत्येकाने, विशेषतः धर्म प्रसारकांनी, आपल्या अंतःकरणात स्वच्छ कोरून ठेवल्या पाहिजेत.”

 

हे झाले इस्लामचे “राष्ट्र”,”राष्ट्रीयता”, “राष्ट्रवाद” या संबंधी विचार.

 

आता आपल्या देशाच्या राज्य घटनेकडे अगदी ओझरती नजर टाकली, तरीही या संकल्पनांना किती महत्वाचे स्थान आहे, ते कळेल. – राज्य घटनेच्या उद्देशिकेतच (Preamble) “राष्ट्राची एकता आणि एकात्मता” यांचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच अनुच्छेद ५१ (क) – “मुलभूत कर्तव्ये” यामध्ये – राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातील स्फूर्तीदायक उदात्त आदर्शांची जोपासना व अनुसरण करणे, भारताची सार्वभौमता,एकता, व एकात्मता यांचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे, राष्ट्रीय सेवा बजावणे, संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, राष्ट्र सतत सर्व क्षेत्रांत चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे निरंतर प्रयत्न करणे, असे अनेक उल्लेख आहेत.

अर्थात घटनेला अभिप्रेत असलेली राष्ट्रीयता आणि इस्लामचे त्याविषयीचे  विचार यांतील विरोध अगदी स्पष्ट आहे. ह्या वर अधिक काही भाष्य करण्याची गरजच नाही ! तरही थोडक्यात सांगायचे, तर असे म्हणता येईल, की – Islam is incompatible with Constitution of India.

ज्याप्रमाणे सध्या निवडणूक आयोग मतदार याद्यांची सखोल पुनर्तपासणी (SIR) हाती घेत आहे, त्याच प्रमाणे दिल्ली बॉम्बस्फोट घटनेच्या अनुषंगाने आपण इस्लामच्या संदर्भात पुन्हा एकदा – Secularism / निधर्मिता या संकल्पना तपासून पाहण्याची गरज आहे. कारण, इस्लामिक विचारधारेत या संकल्पनांना काडीमात्र स्थान नाही.

आपल्या राजकीय नेत्यांनी “इस्लाम आणि राष्ट्रवाद” यासंबंधी तज्ञांचे विचार निदान एकदा तरी नजरेखालून घालावेत. तसे केल्यास त्यांना इस्लामिक विचार आणि राज्यघटनेत अभिप्रेत असलेले राष्ट्रीयत्व यांतील अंतर्विरोध निश्चितच  लक्षात येईल. थोडक्यात सांगायचे तर – या घटनेचे तथाकथित सूत्रधार कोणीही असोत, खरा सूत्रधार इस्लाम , त्याची शिकवण हाच आहे. गेल्या ७८ वर्षात या देशाविरुद्ध जे जे अतिरेकी हल्ले, कट कारस्थाने झाली, त्याच्यामागे इस्लामची शिकवण हेच खरे मूळ कारण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार फाळणीची प्रक्रिया पूर्ण करणे, हाच यावर खरा उपाय आहे.

Exit mobile version