पालघरमध्ये पूरस्थिती! डहाणू-विरार लोकल सेवा ठप्प

पश्चिम, मध्य, हार्बर लोकल उशिराने

पालघरमध्ये पूरस्थिती! डहाणू-विरार लोकल सेवा ठप्प

पालघर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या संततधार आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून, मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. उमरगाव-घोलवड विभागात रेल्वेमार्गावर पाणी साचल्यामुळे डहाणू रोड ते विरार दरम्यानची लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करून पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आज, गुरुवार 23 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना अधिकृत सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य रेल्वे
लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहेत.

हार्बर रेल्वे
लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत.

पश्चिम रेल्वे
डहाणू ते विरार लोकल सेवा पूर्णपणे बंद.
विरार ते चर्चगेट दरम्यान उपनगरीय सेवा वाणगावपर्यंतच सुरू असून लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने

उमरगाव आणि घोलवड दरम्यान रुळांवर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 93002 डहाणू रोड – चर्चगेट ही गाडी 23 जुलै रोजी रद्द करण्यात आली आहे.

जयपूर–बांद्रा टर्मिनस (वापीपर्यंतच धावेल)
बांद्रा टर्मिनस–जयपूर (वापीहून सुटेल)
भुसावळ–दादर (भिलाडपर्यंतच धावेल)
दादर–पोरबंदर (भिलाडहून सुटेल)
विरार–डहाणू रोड (वाणगावपर्यंत)
डहाणू रोड–चर्चगेट (वाणगावहून सुटेल)
विरार–डहाणू रोड (बोईसर/बोरपर्यंत)
डहाणू रोड–चर्चगेट (बोरहून सुटेल)

वेळ बदलेल्या गाड्या
मुंबई सेंट्रल–अहमदाबाद (सकाळी 5.40 वाजता ऐवजी 6.40 वाजता)
बांद्रा टर्मिनस–रामनगर (सकाळी 5.10 वाजता ऐवजी 6.30 वाजता)
मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल (सकाळी 6 वाजता ऐवजी 7 वाजता)
मुंबई सेंट्रल–अहमदाबाद (सकाळी 6.20 वाजता ऐवजी 7.30 वाजता)

वळवण्यात आलेल्या गाड्या
चंदीगड–तिरुवनंतपुरम (सुरत–पालधी–जळगाव मार्गे)
हापा–मडगाव (सुरत–पालधी–जळगाव मार्गे)
अजमेर–सुरत (सुरत–पालधी–जळगाव मार्गे)

हे ही वाचा:

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ९३९ गावे पाण्याखाली

मुंबईच्या मोर्चात घुसलात तर फटकवून काढू, राज ठाकरेंचा इशारा

कंगाल पाकिस्तानची अमेरिकेकडे भीख!

आंदोलकांची दरोडेखोरी! पोलीसांचे ओळखपत्र अन् सोन्याची साखळी लांबवली

प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
पालघर जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी, धबधबे किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version