जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा झाली नाही. आता मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतल्या आमच्या आंदोलनात दिल्लीसारखे कोणी घुसलेले मिळाले तर त्यांना सोडणार नाही, फटकवून काढू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा आता प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिला नाही, तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेला आहे. . रविवारी 26 जुलैला छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावं. कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, फक्त तिरंगा असेल. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे आता तुम्ही बघा.” असं राज ठाकरे म्हणाले.
विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पदावर असताना जबाबदारी घ्यायलाच हवी. हा विषय आता NEET पुरता राहिला नाही. गेल्या काही वर्षांचा राग आता उफाळून आला आहे. न्यायमूर्ती यांना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे बोलत आहे. मुलींना मारले गेले आहे. लाठ्याकाठ्यांनी मारले गेले. न्यायालयाला कुत्रे कबूतरांकडे लक्ष द्यायला वेळ आहे, मात्र झुरळांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
कंगाल पाकिस्तानची अमेरिकेकडे भीख!
आंदोलकांची दरोडेखोरी! पोलीसांचे ओळखपत्र अन् सोन्याची साखळी लांबवली
पेपरफुटी आरोपींसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट; पंतप्रधान मोदींचा इशारा
तुकाराम मुंढेंची बीएमसीच्या मुख्यालयात धाड, कॅन्टीन सील
२६ जुलैच्या आंदोलनात शरद पवारही येऊ शकतात. भाजपचे देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आणि विरोधात कोण हे आता कळेल. काही सिव्हिल ड्रेसमधील लोकांकडे पोलिसांच्या लाठ्या कशा आल्या? हे आंदोलन मोडायला भाजपने पाकिस्तानमधून गुंड आणले आहेत का? असा उलट सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.







