26 C
Mumbai
Saturday, September 19, 2026
घरराजकारणचित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार वितरण सोहळा देशाची राजधानी दिल्लीऐवजी गुजरातमधील केवाडिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. २२ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार असून सोहळ्याचे ठिकाण बदलल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकारने हा सोहळा राष्ट्रीय राजधानीबाहेर देशातील विविध भागांत आयोजित करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून यंदाची निवड केवडियासाठी केल्याचे स्पष्ट केले आहे.

या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातमध्ये हलवण्याच्या निर्णयातून आता मुंबईनंतर दिल्लीचेही महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर हलवण्याची गरजच काय होती आणि गुजरातचीच निवड का करण्यात आली, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी पुरस्कार सोहळ्याचे स्थळ बदलायचेच होते, तर तो मुंबईत का आणला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात घातला. त्यामुळे महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या चित्रपटसृष्टीत मोठे योगदान असलेल्या राज्यांपैकी एखाद्या राज्याची निवड का करण्यात आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध मोठे कार्यक्रम आणि प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी २०२३च्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचाही संदर्भ दिला. तसेच गिफ्ट सिटीसारख्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून गुजरातला सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. देशाची प्रगती ही केवळ गुजरातच्या योगदानातून झालेली नसून, देशातील प्रत्येक प्रांत आणि अनेक पिढ्यांच्या योगदानातून देश उभा राहिला आहे, असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

लडाखकडे पर्यटकांची ओढ! ८ महिन्यांतच चार लाखांचा टप्पा पार

आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

१३ वर्षांपासून फरार आरोपी हरनेक सिंहचे अमेरिकेतून प्रत्यार्पण

आयफोनचा नवा अवतार! २.९९ लाखांचा फोल्डेबल ‘ऍपल ड्युओ’

राज ठाकरे यांनी कलाकारांनाही या निर्णयावर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मुद्दा केवळ केवडिया किंवा इतर कोणते शहर याचा नसून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या दीर्घ परंपरेचा आहे, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र आणि दक्षिणेतील चित्रपटसृष्टीने या निर्णयावर कणखर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा