देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!

गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!

गुजरातमधील श्रीकृष्णाच्या नगरी द्वारकेतील ७ बेटे अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहेत. येथे बेकायदेशीरपणे बांधलेल्या ३६ इमारती पाडण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने ही कारवाई जलदगतीने केली. गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती देत द्वारका बेटे आता १०० टक्के अतिक्रमणमुक्त झाल्याचे म्हटले आहे.

गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी अतिक्रमण हटवल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये संघवी यांनी लिहिले की, ‘देवभूमी द्वारकेतील सातही बेटे बेकायदा बांधकामांपासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत. द्वारकेतील सात वेगवेगळ्या बेटांवरील बेकायदा अतिक्रमणे पूर्णपणे हटवण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने ३६ अवैध धार्मिक अतिक्रमणे हटवली आहेत. राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जिल्हा प्रशासन संघाच्या समर्पण आणि कटिबद्धतेचेही मंत्री महोदयांनी कौतुक केले.

मंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दर्ग्यांसारख्या काही संरचना पूर्वी उभ्या असलेल्या दिसत आहेत, ज्या नंतर जमिनीवर पाडण्यात आल्या. या वास्तू ७ वेगवेगळ्या बेटांवर बांधल्या गेल्या होत्या. या अतिक्रमण करणाऱ्या बांधकामांनी जमिनीचा मोठा भाग व्यापला होता. यानंतर कारवाई करताना द्वारकेच्या इतर भागातही शेकडो बांधकामे पाडण्यात आली आहेत.

हे ही वाचा : 

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अशी दिसणार रश्मिका मंधाना

‘हॅरी पॉटर’ महाकुंभात पोहोचला, भंडाऱ्याचा घेतला आस्वाद?

पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू-उपराष्ट्रपती धनखड महाकुंभात होणार सहभागी, तारीख आली समोर!

महाकुंभ : नवव्या दिवशी सकाळी १५ लाख तर काल ५४ लाखांहून अधिक भक्तांनी केले स्नान!

Exit mobile version