छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलिज होत असून त्यासंदर्भातील नवनवी माहिती रोज समोर येते आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या विकी कौशलचे त्या भूमिकेतील रूप नुकतेच जाहीर करण्यात आले होते. त्याबद्दल लोकांच्या मनातील कुतुहल शमते ना शमते तोच आता या चित्रपटातील रश्मिका मंधानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.
महाराणी येसूबाईंची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका साकारत आहे. येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिकाचे आगळेवेगळे रूप इन्स्टाग्रामवर रिलिज करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र रिलिज होईल, असेही त्या छायाचित्रात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
महाकुंभ : नवव्या दिवशी सकाळी १५ लाख तर काल ५४ लाखांहून अधिक भक्तांनी केले स्नान!
… म्हणून विवेक रामास्वामी यांचा ट्रम्प सरकारमधील DOGE चे काम पाहण्यास नकार!
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात दिसले भारताचे महत्त्व; जयशंकर यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान
बांगलादेशी घुसखोर तुमच्या उंबरठ्याजवळ येऊन पोहोचलाय
या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारीला रिलिज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन आहेत. तर चित्रपटाचे संगीत प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांचे आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका करत आहे.
रश्मिका मंधाना ही सध्याची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री मानली जाते. पुष्पा या चित्रपटातील तिची भूमिका, तिचे नृत्य यावर अक्षरशः लोकांनी जीव ओवाळून टाकला आहे. पण छावा या चित्रपटात तिची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात रश्मिका येसूबाईंची भूमिका कशी करणार याविषयी कुतुहल जागे झाले आहे.