27.2 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरबिजनेसजागतिक बाजारात भारताची दमदार एन्ट्री; पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार

जागतिक बाजारात भारताची दमदार एन्ट्री; पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार

मार्केट कॅप पाच ट्रिलियन डॉलरच्या पुढे

Google News Follow

Related

भारतीय शेअर बाजाराने अलीकडील काळात उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा आपले स्थान मजबूत केले आहे. बाजार भांडवलाच्या आधारे भारताने पुन्हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार होण्याचा मान पटकावला असून, भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलरच्या पुढे पोहोचले आहे. काही काळापूर्वी बाजार भांडवलाच्या बाबतीत भारताला मागे टाकणाऱ्या तैवान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. परिणामी, या दोन्ही देशांचे बाजार भांडवल कमी झाल्याने भारताने पुन्हा पाचवे स्थान मिळवले आहे.

सध्या भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. तुलनेत तैवानच्या शेअर बाजाराचे बाजार भांडवल ४.९७ ट्रिलियन डॉलर, तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचे ४.६६ ट्रिलियन डॉलर इतके आहे. दरम्यान, अमेरिका आणि चीन यांच्या शेअर बाजारांच्या क्रमवारीत किंवा बाजार भांडवलात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील समभागांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी तेजी आल्यामुळे तैवान आणि दक्षिण कोरियातील गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे त्या देशांच्या बाजार भांडवलात घट होऊन जागतिक क्रमवारीत बदल झाला.

जून महिन्यात बहुतांश जागतिक शेअर बाजारांवर दबाव राहिला असताना भारतीय बाजाराने मात्र स्थिर आणि सकारात्मक कामगिरी नोंदवली. या कालावधीत भारताच्या बाजार भांडवलात २.७५ टक्क्यांनी वाढ झाली. त्याउलट दक्षिण कोरियाच्या बाजार भांडवलात ४.७ टक्के, तर तैवानच्या बाजार भांडवलात २.३ टक्क्यांची घट झाली. इतर प्रमुख बाजारांचाही विचार केला तर जपानच्या बाजार भांडवलात सुमारे १ टक्का, हाँगकाँगमध्ये ८.३ टक्क्यांहून अधिक, कॅनडामध्ये ३ टक्के, ब्रिटनमध्ये सुमारे २ टक्के, फ्रान्समध्ये १.१ टक्का, तर जर्मनीमध्ये ५.६ टक्क्यांची घसरण झाली आहे.

बाजार विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली घसरण, शेअर बाजारातील आकर्षक मूल्यांकन आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने होत असलेली गुंतवणूक यामुळे भारतीय शेअर बाजाराला चांगला आधार मिळाला आहे. याशिवाय, निफ्टीचा प्राइस-टू-अर्निंग्स (पी/ई) गुणोत्तर सुमारे २४ पटांवरून १८ पटांपर्यंत घसरल्याने समभागांचे मूल्यांकन अधिक वाजवी झाले असून, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल भारतीय बाजाराकडे वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हे ही वाचा:

नाकात टाकायचे औषध डोळ्यात टाकले? १९ महिन्यांच्या चिमुकल्याची गेली दृष्टी

जगाचा ‘बदला’ घेण्याच्या अजब आणि क्रूर इराद्याने वाटल्या विषारी गोळ्या

AI वर अतिविश्वास ‘फोर्ड’ला पडला महागात; अनुभवी अभियंत्यांना पुन्हा बोलावले

भारत-सेशेल्सला जोडतो हिंद महासागर

भारतीय बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनीही अनेक जागतिक निर्देशांकांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. जून महिन्यात आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये सुमारे ४ टक्के, तर निफ्टीमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा