अयोध्येतील राम मंदिरातील भाविकांच्या देणगीच्या कथित अपहारप्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या प्रकरणातील आठही आरोपींच्या घरांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी एकाच वेळी छापेमारी करत तपासाची व्याप्ती आणखी वाढवली आहे. न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी करण्यापूर्वी ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामागे आणखी मोठे रॅकेट किंवा इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत सुमारे ७९.८५ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक चौकशीत देणगी मोजणी आणि जमा करण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ आरोपींचीच नव्हे, तर संपूर्ण देणगी व्यवस्थापन प्रणालीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
…हल्ले सुरूच राहिले तर इराणचे अस्तित्व संपेल!
कारमध्ये बॉम्बस्फोट करून प्रेयसीसह मरण्याचा होता इरादा, पण…
दुसरे ऑपरेशन ‘सिंधू’: चिनाब-बियास जोडणार; पाकिस्तानला तोडणार!
मुंबईपासून काही तासांत… पावसाचं नंदनवन!
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये देणगी मोजणीच्या प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या मते, हा अपहार एखाद्या एकट्या व्यक्तीचा नसून नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बँक व्यवहार, देणगी जमा करण्याची प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही कसून चौकशी सुरू आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Ram Mandir donations alleged embezzlement case | As part of investigation, Police reach the residence of Rama Shankar (alias Tinnu Yadav) in Ayodhya, one of the accused in this case. pic.twitter.com/lifuvUq1Ll
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 28, 2026
या प्रकरणामुळे देशभरातील भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, मंदिरातील देणगी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि कडक देखरेखीची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून आरोपींची कोठडी मिळाल्यानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या संपूर्ण प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले आहे.







