30.1 C
Mumbai
Sunday, June 28, 2026
घरस्पोर्ट्सलिओनेल मेस्सीचा विश्वचषकात ऐतिहासिक पराक्रम

लिओनेल मेस्सीचा विश्वचषकात ऐतिहासिक पराक्रम

अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू

Google News Follow

Related

फुटबॉलच्या इतिहासात पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा विक्रम अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आपल्या नावावर केला आहे. २०२६ फिफा विश्वचषकात जॉर्डनविरुद्ध झालेल्या सामन्यात अप्रतिम फ्री-किकवर गोल करत मेस्सी सलग सात विश्वचषक सामन्यांत गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. अनेक दिग्गज खेळाडूंना न जमलेली ही कामगिरी करत मेस्सीने पुन्हा एकदा आपली महानता सिद्ध केली आहे.

मेस्सीच्या या ऐतिहासिक मालिकेची सुरुवात २०२२ च्या कतार विश्वचषकातील बाद फेरीपासून झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्री-क्वार्टर फायनल, नेदरलँड्सविरुद्ध उपांत्यपूर्व फेरी, क्रोएशियाविरुद्ध उपांत्य सामना आणि फ्रान्सविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने गोल करत अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर २०२६ विश्वचषकातही त्याचा गोलांचा सिलसिला कायम राहिला. अल्जेरियाविरुद्ध हॅट्ट्रिक, ऑस्ट्रियाविरुद्ध दोन गोल आणि आता जॉर्डनविरुद्धचा शानदार फ्री-किक गोल करत त्याने सलग सात सामन्यांतील गोलांचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.
हे ही वाचा :
राम मंदिर देणगी घोटाळ्यात मोठी कारवाई

…हल्ले सुरूच राहिले तर इराणचे अस्तित्व संपेल!

कारमध्ये बॉम्बस्फोट करून प्रेयसीसह मरण्याचा होता इरादा, पण…

दुसरे ऑपरेशन ‘सिंधू’: चिनाब-बियास जोडणार; पाकिस्तानला तोडणार!

जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात मेस्सी सुरुवातीपासून खेळला नव्हता. प्रशिक्षकांनी त्याला दुसऱ्या हाफमध्ये मैदानात उतरवले. मात्र मैदानात येताच त्याने आपल्या अनुभवाची आणि कौशल्याची झलक दाखवली. सामन्याच्या ८०व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकवर त्याने चेंडू थेट गोलपोस्टच्या जाळ्यात धाडला आणि अर्जेंटिनाचा ३-१ असा विजय निश्चित केला. हा गोल केवळ संघाच्या विजयासाठीच नव्हे, तर फुटबॉलच्या इतिहासातील एका नव्या विक्रमासाठीही महत्त्वाचा ठरला.

याआधी सलग सहा विश्वचषक सामन्यांत गोल करण्याचा विक्रम फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन आणि ब्राझीलचा जैरझिन्हो यांच्या नावावर होता. मात्र मेस्सीने त्यांना मागे टाकत इतिहासात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. वयाच्या ३९व्या वर्षीही त्याचा फिटनेस, खेळावरील नियंत्रण आणि निर्णायक क्षणी संघासाठी योगदान देण्याची क्षमता आजही तितकीच प्रभावी असल्याचे या विक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा