राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच महाकुंभात सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे तिघेही महाकुंभात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभचा भाग होण्यासाठी ५ फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी प्रशासनानेही तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये येणार आहेत आणि महाकुंभात सहभागी होणार आहेत. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड १ फेब्रुवारीला महाकुंभला भेट देणार असल्याची माहिती आहे. महाकुंभ प्रशासन आणि प्रयागराज प्रशासनाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे. असे मानले जाते की या दरम्यान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील संगमामध्ये स्नान करू शकतात.
आत्तापर्यंत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री महाकुंभात स्नान करण्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही महाकुंभात सातत्याने आपली उपस्थिती नोंदवत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देखील महाकुंभाला भेट देण्यासाठी येणार आहेत. लाखो भाविकांसह देशाच्या तीनही प्रमुखांची उपस्थिती ही महत्वाची असणार आहे. १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या महाकुंभाचा आजचा नववा दिवस आहे. आतापर्यंत ८ करोडहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. २६ फेब्रुवारीला महाकुंभ संपणार आहे.हे ही वाचा :
महाकुंभ : नवव्या दिवशी सकाळी १५ लाख तर काल ५४ लाखांहून अधिक भक्तांनी केले स्नान!
… म्हणून विवेक रामास्वामी यांचा ट्रम्प सरकारमधील DOGE चे काम पाहण्यास नकार!
गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोजर फिरणार, फडणवीसांनी दिली तारीख!
‘WHO’ are you? ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली पाठ