सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!

फडणवीसांनी काढला चिमटा; वाहतूक कोंडीबद्दल माफीही मागितली

सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या मार्गिकचे उद्घाटन शुक्रवार, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान, या मार्गाच्या उद्घाटनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मुंबई- पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा थोडा उशीरा सुरू झाला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रवाशांची माफी मागितली.

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील ट्रॅफिक जाममध्ये अनेकजण अडकले, त्यांना त्रास सहन करावा लागला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवाशांची माफी मागितली. या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. सकाळी जवळपास दोन ते तीन तासापासून त्या वाहतूककोंडीत अडकल्या. सुप्रिया सुळे एक्सप्रेस वे वरील वाहतूककोंडीमुळे एका ठिकाणी महाराष्ट्रदिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सुप्रियाताई आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहात, आत्ता तुम्ही कधीच पुण्याला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत. तुमच्या सरकारने जे काम थांबवलं होतं, ते काम आमच्या सरकारने पूर्ण केलंय,” असे म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोलाही लगावला.

हे ही वाचा:

‘मिसिंग लिंक’ नाही, तर ‘कनेक्टिंग लिंक’!

‘मिसिंग लिंक’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

“या अल्लाह! दही भल्ला!” हा धर्माचा अपमान नाही!

६० वर्षांनंतर मिझोराम ‘बंडखोरीमुक्त’ राज्य

टोल न घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

पुणे- मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीची माहिती विविध माध्यांमधून समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून आले असताना त्यांनीही वाहतूककोंडी झाल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेचच वाहतूककोंडीत अडकलेल्या वाहनांना टोल न घेता सोडण्याचे आदेश दिले. “आम्ही वरून (हेलिकॉप्टरमधून) पाहिले, पूर्ण ट्रॅफिक जाम झाले आहे. आजचा कार्यक्रम झाला की, लगेच वाहने त्या मार्गाने सोडू. पण तोपर्यंत मूळ मार्गावरून वाहने सोडायला सांगा. टोल घेऊ नका. थेट पोलिसांनाच गाड्या सोडायला सांगा वाहनांना फ्री मध्ये जाऊ द्या आणि पोलिस तेथे उभे करा,” असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले.

Exit mobile version