नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची काळजी घेतंय फडणवीस सरकार

नामदेव ढसाळ यांच्या पत्नीची काळजी घेतंय फडणवीस सरकार

मनुवादी, संघी म्हणत फडणवीस सरकारला हिणवणाऱ्याना चपराक लगावणारा एक व्हीडिओ समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ब्राह्मणवादी, दलितविरोधी म्हणून त्यांच्यावर सातत्याने पुरोगामी, तथाकथित विचारवंत यांनी टीका केली पण एका व्हिडिओने ढळढळीत सत्य समोर आणले आहे.

सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नाव शाहीर अमर शेख यांच्या कन्या मल्लिका नामदेव ढसाळ या सध्या आजारी आहेत. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून संवाद साधला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नामदेव ढसाळ यांच्या नावे सोयीचे राजकारण करणाऱ्यांना ही एक चपराक असल्याचे म्हटले जात आहे.

दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी ज्येष्ठ साहित्यिका मल्लिका शेख ढसाळ यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विचारपूस केली. त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मल्लिका या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळतात, त्यांनी मोबाईलवर मल्लिका यांची विचारपूस केली. “नामदेव ढसाळ आणि आपल्या कुटुंबाचे समाजासाठी, तसेच साहित्य क्षेत्रासाठी मोठे योगदान आहे, त्यामुळे आपण काळजी करू नये, सर्व प्रकारची मदत आपणांस होईल,” असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मल्लिका यांना दिले. यावेळी मल्लिका देवेंद्र फडणवीस यांना म्हणाल्या की, तुमचे मन मोठे आहे. नामदेव यांच्या नावावर इतके लोक दुकाने थाटून बसले आहेत त्याचे फायदे घेतात. पण, नामदेव ढसाळ यांचे कुटुंबीय कसे राहतात? जगतात की मारतात याचे कोणालाही देणं पडलेलं नाही, याची खंत वाटते. केलेल्या कार्याची परतफेड नको पण माणुसकी म्हणून तरी विचारायला हवे, असं मल्लिका म्हणाल्या.

हे ही वाचा:

एफआयआर स्थगित; आय-पीएसी छाप्याचे सीसीटीव्ही सुरक्षित ठेवा!

मुंबईच्या मतदारांसाठी मराठी अस्मितेपेक्षा नागरी प्रश्न महत्त्वाचे

जॉर्जियाहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडले आणि…

एअर इंडिया अपघात: दिवंगत पायलट कॅप्टनच्या पुतण्याला चौकशीसाठी समन्स

फडणवीस सरकारला कायम संघी विचारसरणीचे सरकार, ब्राह्मण मुख्यमंत्री अशा टीकेला सामोरे जावे लागते. समाजातील इतर घटकांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही अनेकदा बोलले जाते. मात्र, मल्लिका ढसाळ यांच्यासोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच दलित समाज आणि त्यांच्या मतांवरून राजकारण करणाऱ्यांना ही एक सणसणीत चपराक बसल्याचे बोलले जात आहे. दलित समाजाच्या नावे राजकारण करणारे नेते कुठे आहेत? ढसाळ कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होत असताना यावर भाष्य का करत नाहीत? असे सवाल विचारले जात आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसमावेशक अशा राजकारणाची आणि त्यांच्या माणुसकीचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.

Exit mobile version