जगभरात १,१६४ कोटींची कमाई करणारा ‘धुरंधर’ लडाखमध्ये करमुक्त!

लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केली घोषणा

जगभरात १,१६४ कोटींची कमाई करणारा ‘धुरंधर’ लडाखमध्ये करमुक्त!

स्थानिक पर्यटन आणि चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी, लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केंद्रशासित प्रदेशात बॉलीवूड स्पाय थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ करमुक्त करण्याचे घोषित केले आहे. उपराज्यपाल कार्यालयाच्या अधिकृत एक्स पोस्टद्वारे करण्यात आलेली ही घोषणा करण्यात आली आहे. लडाखच्या भूमीवर हा चित्रपट चित्रित केल्यामुळे यात लडाखचे सौंदर्य दिसते शिवाय चित्रपट निर्मितीसाठी या प्रदेशाला एक प्रमुख ठिकाण म्हणून स्थान देण्यासाठी प्रशासनाच्या आगामी नवीन चित्रपट धोरणाशी सुसंगत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय गुप्तहेराभोवतीच्या कथानकावर आहे. लडाखच्या भूभागात चित्रित केलेल्या धुरंधरचे प्रशासनाने या क्षेत्राची क्षमता दाखवल्याबद्दल कौतुक केले आहे. “हा चित्रपट लडाखच्या सिनेमॅटिक लँडस्केपवर प्रकाश टाकतो, चित्रपट निर्मात्यांना मजबूत पाठिंबा दर्शवितो आणि चित्रपट शूटिंग आणि पर्यटनासाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास येण्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रयत्नांना बळकटी देतो,” असे एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या कर माफीमुळे या प्रदेशात अधिक बॉलिवूड उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल. ज्यामुळे आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

“आपले शेजारी वाईट आहेत” पाकिस्तानबद्दल एस जयशंकर काय म्हणाले?

… म्हणून दिल्ली सरकार अरविंद केजरीवालांविरुद्ध एफआयआर दाखल करणार

“मामूसारख्यांच्या भजनी लागलेले ज्वलंत हिंदुत्ववादी बांगलादेशातील हिंदूंविषयी बोलत नाहीत”

राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत आणि २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणून ‘धुरंधर’ समोर आला आहे. १ जानेवारी २०२६ पर्यंत, या चित्रपटाने जगभरात १,१६४ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने ९२६ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पुष्पा २ आणि जवान सारख्या हिट चित्रपटांच्या जागतिक कमाईला मागे टाकले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात मोठा हिंदी सिनेमा म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

Exit mobile version