केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी निर्यातदारांना स्थानिक पुरवठा साखळी आणि उत्पादने यांना प्राधान्य देण्याचे, तसेच भारताची आर्थिक सुरक्षा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय राजधानीत झालेल्या इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट्स प्रमोशन कौन्सिल (ईईपीसी) च्या प्लॅटिनम जयंती सोहळ्यात बोलताना गोयल म्हणाले, “आपण अलीकडेच पाहिले आहे की जेव्हा जेव्हा एखादा देश निर्यातीवर मर्यादा किंवा नियंत्रण आणतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या निर्यातदारांवर आणि उद्योगावर होतो. त्यामुळे आत्मनिर्भर भारत खूप महत्त्वाचा ठरतो.”
केंद्रिय मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा चीनने खतं आणि दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे भारतातील ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादनावर परिणाम होत आहे. याशिवाय, गोयल यांनी उद्योग क्षेत्राला वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही केले. ते पुढे म्हणाले की, अप्रत्यक्ष करप्रणाली अधिक सोपी होणे आणि करदर कमी होणे यामुळे देशांतर्गत मागणीत वाढ होईल आणि विकासदर अधिक वेगाने वाढेल.
हेही वाचा..
४५ लाख खर्च करून अमेरिकेत गेलेल्या तरुणाची हत्या
सुदर्शन रेड्डींनी लालू यादव यांची घेतली भेट; भाजप म्हणाली – ढोंगीपणा उघड झाला!
बिहारमध्ये मतदार यादीत हिंदू कुटूंबात मुस्लिम नावे
‘उत्तम!! रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर कर लावाच!’
याच कार्यक्रमात केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री जितिन प्रसाद यांनी भारतीय निर्यातदारांनी नव्या तंत्रज्ञानाचा आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करावा असे सांगितले आणि व्यवसाय क्षेत्र विद्यमान अनिश्चिततेला सामोरे जाण्यास सक्षम असेल, असा विश्वास व्यक्त केला. सरकारतर्फे पुढील पिढीतील जीएसटी सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. यात करस्लॅबची संख्या कमी करून दोन – ५ टक्के आणि १८ टक्के करण्यात आली आहे. याआधी ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार स्लॅब होते. यासोबत मोठ्या प्रमाणावर वस्तूंवरील करदरात कपात करण्यात आली आहे. हे नवे सुधार २२ सप्टेंबरपासून लागू होत आहेत. बर्नस्टीनच्या अहवालानुसार, केंद्र सरकारने अलीकडे केलेल्या जीएसटी सुधारणांमुळे भारतातील उपभोग झपाट्याने वाढताना दिसेल. याचा लाभ फुटवेअर, एफएमसीजी, वस्त्रउद्योग आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) क्षेत्राला होणार आहे.
