दिल्लीतील स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या!

गृहमंत्री अमित शाह यांचे तपास यंत्रणांना निर्देश

दिल्लीतील स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घ्या!

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसरात झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांकडून घटनेचा तपास केला जात आहे. स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या प्राणघातक हल्ल्याच्या एका दिवसानंतर, गृह मंत्रालयाने मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. हा स्फोट म्हणजे दहशतवादी कृत्य असल्याची दाट शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर स्फोटामागील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी एजन्सींना दिले आहेत.

या कृत्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आमच्या एजन्सींच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे लागेल, असे शाह यांनी लाल किल्ल्यावरील कार स्फोटाबाबत दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “दिल्ली कार स्फोटाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या. या घटनेमागील प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेण्याचे निर्देश दिले. या कृत्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाला आमच्या एजन्सींच्या पूर्ण रोषाला सामोरे जावे लागेल,” असा कठोर इशारा अमित शाह यांनी दिला आहे.

हेही वाचा..

दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे

इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

दिल्लीतील शाळांना ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हायब्रिड मोडमध्ये वर्ग घेण्याचे निर्देश

विहिरीत पडून तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या एका प्रवेशद्वाराजवळील सिग्नलजवळ झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, त्याची चौकशी एनआयएकडे सोपवण्यात आली आहे. नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच, जम्मू-काश्मीर पोलिसांनी रात्रीच्या वेळी छापे टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. ज्यात पुलवामा येथील डॉक्टर उमर उन नबी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. उमर उन नबी हा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि २,९०० किलो स्फोटके जप्त केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या काश्मीरमधील इतर दोन डॉक्टरांच्या संपर्कात होता. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, लाल किल्ल्यावरील स्फोटात डॉ. उमर हा एक महत्त्वाचा दुवा आहे कारण त्याने हुंडई आय २० कार खरेदी केली होती.

Exit mobile version