28.8 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरधर्म संस्कृतीअहमदाबादमध्ये विवाह सोहळ्यात रामाचे भजन लावल्यावरून मुस्लिम समुदायाकडून तोडफोड

अहमदाबादमध्ये विवाह सोहळ्यात रामाचे भजन लावल्यावरून मुस्लिम समुदायाकडून तोडफोड

पोलिसांनी केली धरपकड

Google News Follow

शुक्रवारी उशिरा रात्री, शाहेरकोटडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वोराणा रोजा परिसरात लग्नसमारंभादरम्यान हिंसक संघर्ष उसळला. ही घटना वंदे मातरम् पार्टी प्लॉट येथे घडली. हिंदू विवाह सोहळ्यात लाउडस्पीकरवर राम भजन वाजवली जात असल्याने मुस्लिम समाजातील काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याचा आरोप आहे. त्यावरून तोडफोड, दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.

लाउडस्पीकरच्या आवाजावरून सुरू झालेला वाद लवकरच तीव्र झाला आणि दोन्ही गट आमनेसामने आले. सुमारे २० जणांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. कार्यक्रमस्थळी उभी असलेली दोन वाहने तोडफोड करण्यात आली असून त्यांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

या अचानक झालेल्या हिंसाचारामुळे लग्नसमारंभात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही व्यक्तींनी तलवारीदेखील दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शाहेरकोटडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना “नवरत्न” पुरस्कार

आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीत तेजी

अफगाण सीमेवर पाकिस्तानची मोठी कारवाई

सांध्यांच्या वेदनांपासून आराम हवाय? करा सिद्धासनाचा सराव

या प्रकरणात आतापर्यंत एका अल्पवयीनासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही गटांतील सदस्यांविरुद्ध दंगल आणि तोडफोडीशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा