माजी संरक्षण सचिव अजय कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नियुक्तीला मान्यता

माजी संरक्षण सचिव अजय कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी

केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी प्रीती सुदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर यूपीएससी अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर आता अजय कुमार यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.

केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजय कुमार यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) अध्यक्षपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे. १९८५ च्या बॅचचे केरळ केडरचे आयएएस अजय कुमार हे २३ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संरक्षण सचिव होते.

संरक्षण सचिव म्हणून कार्यरत असताना अजय कुमार यांनी अग्निवीर योजना, आत्मनिर्भर भारत उपक्रम आणि आयुध कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन यासारख्या संरक्षण सुधारणांचे नेतृत्व केले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयातील एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली यूपीआय, आधार, मायगव्ह आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस सारखे डिजिटल इंडिया प्रकल्प राबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१२ देखील तयार केले, ज्यामुळे भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादन उद्योगाला चालना मिळाली.

हे ही वाचा : 

भारताचे उद्योग क्षेत्र ३ ट्रिलियन डॉलर संधी निर्माण करणार

आदमपूर एअरबेसला भेट देत पाकिस्तानचा ‘तो’ दावा मोदींनी ठरवला फोल

‘मोदी अंकल’ तुम्ही माझे हिरो आहात!

पंतप्रधानांनी जवानांचे मनोबल वाढवले

अजय कुमार यांनी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस सरकारांसोबत काम केले आहे. भारत सरकार आणि केरळ सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषवली असून ज्यात केलट्रॉनचे प्रधान सचिव आणि एमडी यांचा समावेश होता. त्यांनी मिनेसोटा विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पीएचडी आणि उपयोजित अर्थशास्त्रात एमएस केले आहे, दोन्हीही पदवी फक्त तीन वर्षांत पूर्ण केली आहेत. तसेच, ते आयआयटी कानपूरचे बीटेक पदवीधर आणि इंडियन नॅशनल अकादमी ऑफ इंजिनिअर्सचे फेलो आहेत.

Exit mobile version