घाटकोपर पोलिसांकडून १२ बांगलादेशींना अटक!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती 

घाटकोपर पोलिसांकडून १२ बांगलादेशींना अटक!

बांगलादेशी रोहिंग्यांविरोधातील मोहिमेने देशभरात वेग घेतला आहे. अशाच प्रकारे राज्यात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे देशात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यास वेग आला आहे. देशभरातून दररोज घुसखोर बांगलादेशींवर कारवाई केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राज्यातही मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबवत अशा घुसखोरांवर कारवाई केली जात आहे. अशाच कारवाई दरम्यान घाटकोपर पोलिसांनी १२ बांगलादेशींना अटक केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली.

बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत भाजपा नेते सोमय्या आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तहसील कार्यालयाला भेट देवून बांगलादेशींना बेकादेशीररित्या देण्यात आलेला जन्म दाखला घोटाळा बाहेर काढण्याचे काम ते करत आहेत. राज्यात दोन लाख बांगलादेशी नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहितीही त्यांनी नुकतीच दिली होती. यावरून यांच्या संख्येचा अंदाज लावू शकतो. यासह अनेकांना बेकादेशीररित्या दाखले दिल्याचेही समोर आले आहे. किरीट सोमय्या यांनी आवाज उठवल्यानंतर आता अशा जन्म दाखल्यांची तपासणी होत आहे.

हे ही वाचा : 

‘विषारी’ दाव्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी प्यायले यमुनेचे पाणी!

परीक्षेला बुरखा घालून बसण्याची परवानगी कशाला? लांगुलचालन खपवून घेणार नाही

तुरुंग अधिकाऱ्यांवर काफिर म्हणत केला हल्ला

काँग्रेसच्या चुकांमुळे भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याची संधी मिळाली

विशेष म्हणजे, राज्यात असेही घुसखोर बांगलादेशी सापडले आहेत, ज्यांच्याकडे जन्म दाखले, आधार कार्ड, क्रेडीट कार्ड, अशा प्रकारचे अनेक कागदपत्रे सापडले आहेत. तसेच १०-१२ वर्षांपासून राज्यात स्थायिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे. राज्यातील मुंबई पोलिसांची विशेष पथके कारवाई करत घुसखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम करत आहेत.

घाटकोपर पोलिसांनी अशीच कारवाई करत १२ बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. रोहिमा शहाबुद्दीन खान, शकील कादर शेख, रूखसाना शकील शेख, वहीदुल फैजल खान, जस्मिन वहीदुल खान, सिमरन वहीदुल खान, हसन अब्दुल रशीद खान, अब्दुल आजीज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचाकडून आधारकार्ड, वीसा, विशेष म्हणजे त्यांच्याकडे मतदान कार्ड, गॅस पासबुक, ड्रायविंग लायसन्स, रेशन कार्डही सापडले आहेत. पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे जप्त केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

Exit mobile version