पाकिस्तानच्या खोटारडेपणाची हद्द, म्हणे भारताच्या एअर मार्शलना नोकरीवरून काढले!

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट-चेक युनिटने दिली माहिती 

पाकिस्तानच्या खोटारडेपणाची हद्द, म्हणे भारताच्या एअर मार्शलना नोकरीवरून काढले!

गेल्या महिन्यात वायुसेना उपप्रमुख पदावरून निवृत्त झालेले एअर मार्शल सुजीत पुष्पकर धारकर यांना पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्यास नकार दिल्याबद्दल काढून टाकण्यात आल्याचा खोटा दावा करणारे अनेक पाकिस्तान समर्थक तोंडावर पडले आहेत. भारत सरकारने पाकचा खोटारडेपणा उघड करत त्यांचे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची स्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तान भारतीय हल्ल्यापासून इतका घाबरला आहे की कधी माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तहरा रात्री पत्रकार परिषद घेत आहेत तर कधी पाकिस्तानी सैन्य धमक्या देत आहे. पाकिस्तान समर्थक सोशल मीडिया वापरकर्तेही वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त होत नाहीत. भारतीय सैन्याबद्दल दररोज खोटेपणा पसरवला जात आहे. पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्यास नकार दिल्याबद्दल हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल सुजीत पुष्पकर धारकर यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण वास्तव वेगळे आहे.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट-चेक युनिटने याबाबत पोस्टकरत पाकचा खोटा दावा उघड केला आहे. ट्वीटकरत त्यांनी म्हटले, पाकिस्तान समर्थक अनेक सोशल मीडिया अकाउंट्सनी खोटा दावा केला आहे की पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्यास नकार दिल्याबद्दल हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल सुजीत पुष्पकर धारकर यांना काढून टाकण्यात आले आहे. मात्र, हे दावे खोटे आहेत. एअर मार्शल एसपी धारकर ४० वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर ३० एप्रिल २०२५ रोजी भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत.

हे ही वाचा : 

संपूर्ण काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, ३ हजारांहून अधिक लोक ताब्यात!

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले

पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक

कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, एक कुशल लढाऊ वैमानिक एअर मार्शल सुजीत पुष्पकर धारकर यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते सध्या हवाई दल प्रमुख असलेले एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्या जागी आले. त्यांच्या निवृत्तीनंतर सध्या साउथ वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम करणारे एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी एअर स्टाफ उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

Exit mobile version