पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णयामुळे जीएसटी – २ हे उद्याचे धोरण नवीन पिढीसाठी… देशासाठी… उन्नतीसाठी… भरभराटीसाठी… सामान्य ग्राहकांसाठी एक शक्ती देणारे ठरणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केंद्रसरकारच्या धोरणाचे कौतुक केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रसरकारचे सुनिल तटकरे यांनी मनापासून आभार मानले. रायगड जिल्ह्यातील निजामपूर, रोहा, माणगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झालेली होती आणि ग्राहकांच्या मनात आनंदाचे वातावरण या क्रांतिकारी निर्णयामुळे झालेले पहायला मिळाल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवीन जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. याअंतर्गत आधी ४ स्लॅब्समध्ये असलेला जीएसटी आता २ स्लॅब्समध्ये आणण्यात आला आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा अनेक शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.